Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त
नांदेड जिल्ह्यातून आले होते बीड जिल्ह्यात कामाला
शिलाबाई सुरेश शेरफुले अस त्या मृत पत्नीच नाव आहे. गेल्या १५ वर्षापासून ते कामाला बीड जिल्ह्यात आले होते. सालगडी म्हणून तीच कुटुंब काम करत होत. मात्र पत्नीवर असलेल्या संशयाने त्यांचा घात केला आणि सुरेश शेरफुले याने आपल्याच बायकोचा घात केला. हत्या करून नातेवाईकाना हर्ट अटॅक आल्याच सांगण्यात आल.
बायकोला केली जबर मारहाण!
सुरेश शेरफुले याने आपल्या बायकोला २३ जानेवारीला जाब विचारला. त्याला आपल्या बायकोवर संशय होता. या वादातून त्याने थेट बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. घरातील काठीने त्याने आधी कपाळावर मारल, उजव्या कानाजवळ आणि डोळ्याच्या वरच्या भागावर आणि पायाच्या नडगीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर घाबरलेल्या अवस्थेत त्याने नातेवाईकांना कॉल केला आणि कॉल करून त्याने हर्ट अटॅक आल्याच सांगितलं. मात्र हे करण जास्त काळ टिकू शकल नाही. बर्दापूर पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची मारहाण करत निर्घून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरेश शेरफुले याला ताब्यात घेतलं आहे. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल. तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्या जखमा बघून नातेवाईक यांना संशय आला आणि त्यांनी पोस्ट मार्टेम रिपोर्ट मागितला. त्यात तिचा मृत्यू झाल्याच समोर आल. पोलीसांनी सुरेश शेरफुले यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्याने आपण स्वतः हत्या केली असल्याचं कबुली दिली आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील हातोला गावात.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय.
Ans: पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मारहाणीच्या गंभीर जखमा आढळल्यानंतर खून उघड झाला.






