Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी

कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि भोकरवाडी येथील टोलनाक्यावर माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 02:56 PM
टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्...; कारमधील तिघे जखमी

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्...; कारमधील तिघे जखमी

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगातील कारचे टायर फुटून एक अपघात झाला. यामध्ये कारने दोनशे फूट जाऊन एका शेतात पलटी झाली ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता. पैठण) फाट्यावर बोरेश्वर मंदिराजवळ मंगळवारी (दि.३१) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बीड येथील ओमकार सानप हे खाजगी कामानिमित्त आपल्या दोन मित्रांसोबत बीड येथून छत्रपती संभाजीनगरकडे एमएच १४ एफएक्स १८२५ या क्रमांकाच्या कारने जात होते. मुरमा फाट्याजवळील बोरेश्वर मंदिरासमोर आले असता अचानक कारचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन अनेक पलट्या घेत सुमारे २०० फूट अंतरावर शेतात घुसली. वेग अधिक असल्याने कार शेवटी झाडावर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि भोकरवाडी येथील टोलनाक्यावर माहिती दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेवरील कर्मचारी महेश जाधव, आत्माराम गाडेकर, रवी गाढे यांनी जखमींना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घाटीत उपचार सुरू

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमान शेख यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. ओमकार सानप याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत, विष्णू सानप आणि ताराचंद घडे हे करत आहेत.

रत्नागिरीत टेम्पोची दुचाकीला धडक

दुसऱ्या एका घटनेत, शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजन जयवंत जाधव (वय ७३, रा. शंखेश्वर गार्डन, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

Web Title: Speeding car overturns after tire bursts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Accident News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.