Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. नीटची परीक्षाही दिली. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे तिने नर्सिंगचा मार्ग निवडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 08:36 AM
धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

Follow Us
Follow Us:

अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक व आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना अकोला शहरात पुढे आली. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक अडचण व महाविद्यालयाच्या वाढत्या फीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

भूमिका श्याम धबडगाव (वय २०, रा. गणराय अपार्टमेंट, जठारपेठ, अकोला) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जीएनएम नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. नीटची परीक्षाही दिली. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे तिने नर्सिंगचा मार्ग निवडला. वडिलांनुसार, सुरुवातीला महाविद्यालयाने कमी फी सांगितली. मात्र, नंतर फीमध्ये सातत्याने वाढ केली. ती प्रचंड मानसिक तणावात होती, यातूनच तिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाढीव शैक्षणिक शुल्काने नैराश्य

महाविद्यालयाने सुरुवातीला १० हजार, प्रवेश निश्चित झाल्यावर ३० हजार, त्यानंतर ४७ हजार आणि पुढे ९० हजार रुपये अशी सतत वाढीव फी सांगितली. तीन वर्षांच्या शिक्षणासाठी सुमारे २ लाख ७० हजार रुपये भरावे लागतील, हे ऐकल्यानंतर भूमिका नैराश्येत गेली. आपले आई-वडील इतकी मोठी रक्कम कशी भरणार? या चिंतेत ती होती. वडिलांनी धीर देण्याचा प्रयत्न केला होता.

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

वडिलांनी दिला होता धीर

‘तू घाबरू नकोस, आई-बाप जिवंत असेपर्यंत तुझे शिक्षण आम्ही करू,’ असा विश्वास त्यांनी दिला. मात्र, याच मानसिक तणावातून तिने जीवनयात्रा संपवली, असे वडील श्याम धबडगाव यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातही विद्यार्थिनीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावातील रहिवासी आकांक्षा चतुर्वेदी हिने तिच्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आकांक्षाला नुकत्याच झालेल्या परीक्षेत ६५० गुण मिळविण्याची आशा होती, परंतु पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर ती नैराश्येत गेली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

NEET UG Re-Exam : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?

Web Title: Student in despair over lack of nursing course fees ends life by hanging incident in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • akola news
  • Suicide case

संबंधित बातम्या

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण
1

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना
2

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…
3

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
4

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.