काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य
Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना
मृत्यूचे कारण केले स्पष्ट
अजयगडमधील लोढा पूर्वा गावची रहिवासी असलेली सृष्टी, उर्फ प्रिया मिश्रा, बीएससीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिने काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. पण याचा आनंद तिला साजरा करायला मिळाला नाही. २२ वर्षीय प्रियाने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ५ जून रोजी सल्फास खाऊन आपले आयुष्य संपवले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथेच डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामागचे कारण तिला होणारा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग असल्याचे स्पष्ट होत आहे.
मृत्यूपूर्वी बनवला होता व्हिडिओ
या आत्महत्येमागचे खरे कारण तेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलिसांनी प्रियाच्या मोबाईलची तपासणी सुरु केली. मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाइड नोट, व्हाट्सॲप चॅट्स आणि एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये प्रिया रडत आपल्यावर होणाऱ्या छळाची आणि ब्लॅकमेलिंगची कबुली देताना दिसून आली. आरोपीच्या धमक्यांना ती किती त्रासली आहे हे तिने व्हिडिओत स्पष्ट केले.
आरोपी कोण?
या प्रकरणात पिडित मुलीचे वडिल सुरेश कुमार मिश्रा यांनी गावातील रहिवाशी धीरेन्द्र उर्फ बड़कू सिंह याच्यावर प्रियाच्या मृत्यूचा आरोप लावला आहे. त्यांनी सांगितले की, आरोपी बऱ्याच काळापासून प्रियाला शारीरिक संबंध संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. व्हिडिओ व्हायरल करने अशी धमकीही तो प्रियाला देत होता ज्यामुळे मानसिकदृष्ट्या तिचे खच्चीकरण झाले.
Virar Cirme: कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह
पोलिसांनी केली कारवाई
प्नन्ना पोलिसांनी घटनेच्या २४ तासातच प्रकरणाची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आरोपाला अटक केली असून त्याच्याकडून दोन मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे,आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.






