Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…

तरुण बाह्यवळण मार्गावर गेला. वाडीकडून यू-टर्न घेत एक आयशर ट्रक कमी वेगाने जात असताना त्याने अचानक ट्रकच्या पुढील आणि मागील चाकांच्या मधोमध उडी घेतली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 02:19 PM
कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्...

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : कामाच्या शोधात पश्चिम बंगालहून नागपुरात आलेल्या एका तरुणाने धावत्या आयशर ट्रकखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वी तो एका चहाच्या टपरीवर गेला होता. तेथे त्याने ‘मै मर जाऊंगा’ असे बोलून दाखवले होते. त्यानंतर काही वेळातच त्याने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना व्हाईट हाऊस चौक ते वाडी बाह्यवळण मार्गावर घडली. मृत तरुणाच्या खिशात ओळख पटवणारे कोणतेही कागदपत्र सापडले नसल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान गिट्टीखदान पोलिसांसमोर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हजारीपहाड येथील दिनेश सुखलाल गौतम (वय ३५) यांचे या मार्गावर चहाचे दुकान आहे. घटनेपूर्वी संबंधित तरुण त्यांच्या दुकानावर आला होता. त्याने आपण पश्चिम बंगालहून नागपुरात कामाच्या शोधात आल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पोटभर अन्न मिळाले नसल्याचेही त्याने दिनेश यांना सांगितले. तरुणाची अवस्था पाहून दिनेश यांनी त्याला चहा दिला. चहा घेत असतानाच तो अस्वस्थ असल्याचे दिसून आले. बोलता बोलता त्याने ‘मै मर जाऊंगा’ असे उद्गार काढले. त्यावेळी त्याच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, चहा पिऊन दुकानातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्याने टोकाचे पाऊल उचलले.

ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

तरुण बाह्यवळण मार्गावर गेला. वाडीकडून यू-टर्न घेत एक आयशर ट्रक कमी वेगाने जात असताना त्याने अचानक ट्रकच्या पुढील आणि मागील चाकांच्या मधोमध उडी घेतली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेला ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होऊन अबोला झाला. या तणावातून नंदिनी मंगलकर (वय ४५, रा. मिरे ले-आऊट, नंदनवर) हिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनीचे पती महेश व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपूर्वी पती-पत्नीत क्षुल्लक वाद झाला. नंदीनीने मनावर ताण घेतला. दोघांत अबोला आणि दुरावा वाढला. परंतु, तिला हे सहन झाले नाही.

Crime News : LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता ! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

Web Title: Suicide of young man who had come in search of work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News
  • Suicide case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.