Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Swargate Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती; आरोपीने थेट पोलिसांच्या गणवेशात…

Dattatray Gade: पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेला अटक केली आहे. कोर्टाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2025 | 09:25 AM
100 एकर शेत धुंडाळूनही सापडेना गाडेचा मोबाईल; घराची झडती घेत...

100 एकर शेत धुंडाळूनही सापडेना गाडेचा मोबाईल; घराची झडती घेत...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मागील आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केली आहे. कोर्टाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  मात्र आता या आरोपीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय गडेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. चौकशीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून बस स्थानकाच्या परिसरात वावरत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण पोलिसांनी केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर , स्वारगेट, शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बसस्थानकात वावर असल्याचे समोर आले आहे. तसेच आशा प्रकारचे आणखी काही गुन्हे गाडेने केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पुणे कोर्टाने आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावळेस कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली आहे. आरोपी दत्ता गाडेने स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. अखेर अथक प्रयत्न करून पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आता पोलिस कोठडीत त्याची चौकशी केली जाईल. त्यातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Swargate Datta Gade Custody: नराधम दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची पोलिस कोठडी; स्वारगेट प्रकरणात पुढे काय होणार?

दत्ता गाडेचा पोलिसांसमोर खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने यांनी पोलिस कोठडीत टाहो फोडला. माझं चुकलं, मी पापी आहे, असं म्हणत तो रडत असल्याचे पुढे आलं आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही. आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावा आरोपीने पोलिसांसमोर केला असल्याचे सांगण्यात आलं आहे.

नराधम गाडे नेमकं कसा पळाला?

दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिसांत १, शिक्रापूर येथे दोन तसेच शिरूर, कोतवाली व सुपा येथे प्रत्येकी एक असे ६ गुन्हे नोंद आहेत. हे सर्व गुन्हे मोबाईल स्नॅचिंगचे आहे. तो स्मार्ट आहे. घटनेच्या दिवशी तो मध्यरात्री गावावरून भाजीच्या गाडीत स्वारगेटपर्यंत आला होता. तेथून तो स्वारगेट बसस्थानकात थांबला, असेही समोर आले आहे.

Web Title: Swargate bus depo shivshahi bus girl assissination case accused dattatray gade wearing police uniform pune police investigation crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police
  • Swargate Case

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
4

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.