
Dr neelam gorhe
शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी सव्वासहाच्या सुमारास एक तरुण बंगल्यात शिरला. डॉ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाने त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीत हातोडा, पक्कड, हातमोजे, दहा मीटर लांबीची दोरी सापडली. निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीतील नळजोड बंद केला होता.
‘गोरे बाईंच्या नावात ‘नि’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते’; सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला
पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे सापडली. गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी तरुण डॉ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानात का शिरला, त्याची खरी ओळख काय आहे ? यादृष्टीने तपास करण्याची गरजा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तरुणाला सोडविण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून दबाब आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाचा चोरीचा हेतू होता का आणखी काही ? यादृष्टीने सखोल तपास करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानात बेकायदा प्रवेश करणे, तसेच त्याच्याकडे हातोडा सापडणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
डॉ. नीलम गोऱ्हे बिनविरोध
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. महाराष्ट्र विधानभवन येथे त्यांच्या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.