Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…

विश्वासाने काम करणाऱ्या कामगारानेच जावयासोबत कट रचून मालकाची रोकड लुटीचा डाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट पोलिसांनी सासरा, जावई व त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2026 | 04:43 PM
जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्...

जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : विश्वासाने काम करणाऱ्या कामगारानेच जावयासोबत कट रचून मालकाची रोकड लुटीचा डाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ६ लाख ५० हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला होता. पण १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासावरून स्वारगेट पोलिसांनी सासरा, जावई व त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

जयंत रजनीकांत शहा (वय ५९), सोहेल अलीअहमद खान (वय ३५) आणि तौसीफ मुकीद बागवान (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ९ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास गुलटेकडी येथील ‘हर्ष रेसिडेन्सीज’ या सोसायटीजवळ ही घटना घडली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम अंमलदार नाना भांदुर्गे, सागर केकान, सागर काळे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण, महिला पोलिस अंमलदार अनिता घायतडक यांच्यासह पथकाने केली आहे.

व्यावसायिक हे आपल्या दिवसभराच्या व्यवसायातील रक्कम एका बॅगेत घेऊन घरी परतले होते. सोसायटीच्या गेटवर पोहोचल्यानंतर त्यांचा वॉचमन चंद्रासिंग हाती बॅग घेऊन फिर्यादींसोबत आत जात होता. याचवेळी दबा धरून बसलेल्या एकाने वॉचमनच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. काही समजण्याच्या आतच, हा चोरटा थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड (दुचाकी) वर बसून आपल्या साथीदारासह अंधाराचा फायदा घेत पसार झाला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळापासून ते आरोपींच्या पळण्याच्या मार्गावरील तब्बल १५० ते १६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

कर्ज फेडण्यासाठी रचला कट

शहा हा तक्रारदार व्यावसायिकाकडे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होता. त्यामुळे मालकाची माहिती त्याला होती. शहा आणि त्याचा जावई सोहेल यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी शहा याने स्वतःच्याच मालकाला लुटण्याचा कट रचला. या कटात त्याने जावई सोहेल आणि त्याचा मित्र तौसीफ यांना सामील करून घेतले. आखलेल्या योजनेनुसार, शहा याने दिलेल्या माहितीच्या आधारे सोहेल आणि तौसीफ या दोघांनी प्रत्यक्ष लुटीचा गुन्हा केला.

Web Title: Swargate police have arrested three thieves who snatched a bag and fled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.