Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टॅक्स घोटाळा’ कॉल सेंटरचा पर्दाफाश! अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरचा गंडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स कमी करण्याच्या नावाखाली लाखो डॉलरने गंडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ११२ तरुणींसह सहा संचालकांना ताब्यात घेतले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 03:41 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'टॅक्स घोटाळा' कॉल सेंटरचा पर्दाफाश! (Photo Credit - AI)

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'टॅक्स घोटाळा' कॉल सेंटरचा पर्दाफाश! (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • चिकलठाणा एमआयडीसीतील ‘के. एस. इंटरप्राईजेस’वर पोलिसांचे छापे
  • टॅक्स कमी करण्याच्या नावाखाली फसवणूक
  • कॉल सेंटरचे गुजरात कनेक्शन उघड
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): हेराफेरी करून नागरिकांना गंडवण्याचे काम कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, यावेळी अमेरिकेतील नागरिकांना त्यांचा लागलेला टॅक्स (कर) कमी करून देण्याच्या नावाखाली लाखो डॉलरची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईत पोलिसांनी ११२ तरुणींसह कॉल सेंटरच्या चालकांना उशिरा रात्रीपर्यंत ताब्यात घेतले आहे.

नेमका काय होता घोटाळा?

पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या तक्रारीनुसार, चिकलठाणा एमआयडीसी, टी ७ येथील एका तीन मजली इमारतीत ‘के. एस. इंटरप्राईजेस’ नावाचे एक अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेटद्वारे संपर्क साधला जात होता. त्यांना जास्त टॅक्स आल्याचे सांगून, टॅक्स कमी करण्यासाठी विविध आमिष दाखवली जात होती. टॅक्समध्ये बचत करण्याच्या नावाखाली त्यांना काही गिफ्ट खरेदी करण्यास सांगितले जाई आणि त्या गिफ्टवरील कोडच्या आधारे डॉलरच्या रूपात त्यांची लाखो डॉलरने फसवणूक केली जात होती.

कामगार न्यायालयीन कोठडीत, संचालकांना पोलिस कोठडी

या कारवाईत ताब्यात घेतलेल्या ११२ कर्मचाऱ्यांसह सहा जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने कॉल सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. तर, कंपनीचा व्यवहार सांभाळणाऱ्या सहा जणांना न्यायालयाने पोलिस कोठडीचे आदेश सुनावले.

Nashik News: विधिसंघर्षित बालकांचे पालकही रडारवर, पोलिसांनी घेतली कठोर भूमिका

गुजरात कनेक्शन आणि दिल्लीचा जागामालक

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरचे चालक गुजरात येथील आहेत. कॉल सेंटर सुरू असलेली जागा मात्र दिल्लीत राहणाऱ्या एका मराठी व्यक्तीची आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंपनी चालवणाऱ्या संचालक मंडळाने जागा मालकाशी केलेला ५८ पानी करार पोलिसांच्या हाती लागला आहे. या करारामध्ये कॉल सेंटरमध्ये आयटी कंपनीचे आणि सॉफ्टवेअरचे काम करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांना मोठे यश

काही महिन्यांपूर्वी इगतपुरी येथे अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांना ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीला अटक झाली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्यासह सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे, दामिनी पथक आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे कर्मचारी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhajinagar: इंजिनिअर तरुणीची थायलंडमध्ये विक्री; कंपनी मालकाने फसवून पाठवले परदेशात, दूतावासाच्या मदतीने सुटका

Web Title: Tax scam call center exposed in chhatrapati sambhajinagar american citizens swindled out of millions of dollars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • USA news

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले
1

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब
2

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhajinagar: संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई
3

Chhatrapati Sambhajinagar: संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई

धक्कादायक! ‘डोक्यावर हात ठेवला अन् लिंबू कापला….’, सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’!
4

धक्कादायक! ‘डोक्यावर हात ठेवला अन् लिंबू कापला….’, सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.