Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; घरी जाताना अपहरण केलं अन्…

सततच्या तणावामुळे विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या वागणुकीत बदल जाणवून मैत्रिणीने चौकशी केली. त्यावेळी विद्यार्थिनीने सर्व घडलेला प्रकार सांगितला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2025 | 12:30 PM
शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर येथे एका शिक्षकाने अकरावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

नराधम शिक्षकाने प्रेमाचा तगादा लावून नकार मिळाल्यानंतर आपल्या साथीदारासह विद्यार्थिनीचे अपहरण करून गुंगीचे औषध पाजत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना दोन महिन्यांपू्र्वी घडली होती. आता याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिक्षक महेश विजय मखमले (रा. मलकापूर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि त्याचा साथीदार सिद्धेश्वर जायभये (कारचालक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, 16 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घेताना शिक्षक महेश मखमले याला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला. तोच क्रमांक नंतर विद्यार्थिनीच्या वापरात असल्याचे लक्षात येताच, आरोपीने तिच्याशी संपर्क साधून प्रेमाची मागणी सुरू केली. ‘मी पत्नीला सोडून तुझ्यासोबत राहीन’, असे तो वारंवार सांगत होता. मात्र, विद्यार्थिनीने प्रत्येक वेळी ठाम नकार दिला.

परीक्षेवेळी विद्यार्थिनीवर दबाव

नंतर परीक्षेच्या वेळी आरोपीने महाविद्यालयात येऊन विद्यार्थिनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वर्तनामुळे घाबरून विद्यार्थिनीने परीक्षा न देता परत शहरात आली. या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने आपल्या साथीदारासह छत्रपती संभाजीनगर गाठले आणि क्लास सुटल्यानंतर रस्त्यावरून जात असताना तिचे अपहरण केले.

शुद्धीवर आल्यानंतर आरोपीस विनवणी

आरोपींनी विद्यार्थिनीला जबरदस्तीने चारचाकीत बसवून तिला गुंगीकारक औषध पाजले. नंतर दर्गा परिसरातील एकांतस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी शुद्धीवर आल्यानंतर शरीरावर जखमांचे चट्टे दिसल्याने विद्यार्थिनीने आरोपीकडे गयावया केल्या. त्यानंतर आरोपींनी तिला हॉस्टेलवर सोडले.

मैत्रिणीला सांगितल्याने प्रकरण उघडकीस..

सततच्या तणावामुळे विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या वागणुकीत बदल जाणवून मैत्रिणीने चौकशी केली. त्यावेळी विद्यार्थिनीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. दोघींनी मिळून हा प्रकार पालकांना सांगितला आणि अखेर जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेदेखील वाचा : Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?

Web Title: Teacher abused student incident in chhatrapati sambhaji nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Abused Case
  • Crime in Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

तलाठी, कोतवाल ACB च्या जाळ्यात; 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
1

तलाठी, कोतवाल ACB च्या जाळ्यात; 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन
3

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
4

धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.