Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

बाप्पाला निरोप देण्यासाठी विद्यार्थी तलावात उतरले; मात्र पाण्याखालील धोकादायक खोलीचा अंदाजच आला नाही. क्षणात विसर्जनाचा आनंद शोककळेत बदलला आणि संगारेड्डीत सहा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 17, 2026 | 03:46 PM
Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • विसर्जनावेळी सहा बळी
  • संगारेड्डीत गणेशोत्सवाला गालबोट
  • तलावात बुडून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
तेलंगणा : गणेशोत्सवाच्या आनंदात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या सहा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात घडली. पेड्डाकंजर्ला गावाजवळील नेरेडू चेरुवू तलावात बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरीषा चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित विद्यार्थी गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावावर गेले होते. विद्यार्थ्यांनी मूर्ती पाण्यात नेण्यासाठी तलावात प्रवेश केला. मात्र, पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे काही विद्यार्थी अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. या दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काही विद्यार्थ्यांनी पोहत किनारा गाठल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. मृतांमध्ये नरसिंहा राजू, सुमंत, गणेश, उदय किरण, शाम कुमार आणि सिद्धार्थ यांचा समावेश असल्याचे विविध वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मृतांपैकी काही जण डिप्लोमा आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते, तर सिद्धार्थ दहावीमध्ये शिकत होता.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तरुणींना हॉटेलमध्ये डांबून ठेवून…

स्थानिकांनी केले बचावकार्य

विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तलावातून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाटणचेरू येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दुर्घटनेच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका वृत्तानुसार, घटनास्थळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती आणि विद्यार्थ्यांसोबत ट्रस्टचे प्रौढ प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनाकडूनही मदतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Telangana sangareddy ganesh visarjan six students drown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Ganesh Festival
  • ganesh utsav
  • Telangana

संबंधित बातम्या

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
1

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…
2

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…
3

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

Father-in-Law Suicide Case: सांगलीत सुनेचा थरार! २० लाखांची मागणी अन् बलात्काराच्या धमकीने त्रासलेल्या सासऱ्याची आत्महत्या!
4

Father-in-Law Suicide Case: सांगलीत सुनेचा थरार! २० लाखांची मागणी अन् बलात्काराच्या धमकीने त्रासलेल्या सासऱ्याची आत्महत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.