Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पेपरफुटीचे कनेक्शन परराज्यात; आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक थेट बिहारकडे रवाना

सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थीना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात १९ जणांना अटक झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 12:40 PM
TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; धानोरात तहसील कार्यालयावर शिक्षकांची धडक

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; धानोरात तहसील कार्यालयावर शिक्षकांची धडक

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ‘टीईटी’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण राज्यात गाजत आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यात परराज्यातील पाच नावे पोलिस तपासात उघडकीस आली आहेत. बिहारच्या रितेशकुमारसोबत ललित कुमार, सलाम, महंमद अशांचा सहभाग समोर आल्याने पाचही जणांचा शोध घेतला जात आहे. मध्यरात्री पोलिसांचे एक पथक बिहारकडे रवाना करण्यात आले. कोल्हापुरात या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खटाटोप करणाऱ्यांचाही सहभाग आहे.

सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थीना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात १९ जणांना अटक झाली असून, आणखीन सात जणांचा शोध सुरू आहे. यापैकी पाच संशयित हे परप्रांतीय असल्याने पेपर छपाईच्या ठिकाणाहून त्यांनी हे पेपर पुरविल्याचे समोर येत आहे. कराडचा मुख्य संशयित महेश गायकवाड (वय ४०) हा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पुढे सरकत आहे.

संशयितांच्या ‘कॉल डिटेल्स’ आधारे शोध घेतला जात आहे. तपासी अधिकारी उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर हे दिवसभर मुरगूड येथे होते. अटकेतील संशयितांकडून अधिकाधिक माहिती घेण्याचे काम ते करत आहेत. यासोबतच मुरगूड पोलिसांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे, मुंबई येथील संशयितांचा शोध घेत आहेत.

गायकवाडचा इतर जिल्ह्यात संपर्क

मुख्य संशयित महेश गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याने २०२३ पासून पेपर फोडण्याचे हे रॅकेट चालवल्याचा संशय आहे. त्याने सातारा जिल्ह्यातही असे पेपर फोडले आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला आहे. सातारा, कोल्हापूरसह राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांत महेश गायकवाडचा संपर्क होता, याचीही माहिती घेतली जात आहे.

प्रभारी प्राचार्य, प्राध्यापकाचे निलंबन

टीईटी पेपर फुटीप्रकरणाशी संबंधित असलेले राधानगरी तालुक्यातील एका महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व बिद्री येथील एका सीएचबीधारक प्राध्यापकावर संबंधित संस्थांनी तत्काळ निलंबनाची कारवाई केली. विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक संचालकांनी पेपरफुटी प्रकरणावरून संबंधित संस्थांना पत्र पाठवले होते. त्याची गंभीर दखल घेऊन संस्थांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

180 विद्यार्थ्यांची यादी समोर

छाप्यावेळी जवळपास १८० विद्यार्थ्यांची यादी पोलिसांना मिळून आली होती. तसेच हे पेपर विक्री करणारे शिक्षक, एजंटांच्या कॉल रेकॉर्डआधारे ‘लाभार्थी’ची माहिती घेतली जात आहे. फोनवरून संपर्क केलेल्यांना पेपरमधील माहिती देण्यात आली होती का?, त्यांच्याकडून किती पैसे उकळण्यात आले? याचीही माहिती घेतली जाणार आहे.

सात आरोपी अद्याप फरार, 26 जणांवर गुन्हा दाखल

टीईटी पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत २६ जणांवर ज गुन्हा नोंद झाला असून, यातील १९ आरोपींना अटक स करण्यात यश आले आहे. यातील सात आरोपी अद्याप फरार आहेत. या सर्वांना शोधण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

हेदेखील वाचा : महा TET परीक्षा झाली सुरळीत! ‘या’ दोन केंद्रावर आठ उमेदवारांची हकालपट्टी, पारदर्शकतेवर भर

Web Title: Tet paper leak connection in another state police team leaves for bihar to search for accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • Education Sector
  • Maharashtra Exam
  • TET Exam

संबंधित बातम्या

तब्बल 50000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; शिक्षकांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला कोर्टात आव्हान
1

तब्बल 50000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; शिक्षकांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला कोर्टात आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.