काय नेमकं प्रकरण?
२०२४ मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महिला गरोदर असतांना पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतांना पतीने मारहाण केली होती. इतकंच नाही तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.
बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न
यांनतर बाळाच्या जन्मानंतर महिला जून २०२५ रोजी आपल्या आईच्या घरी परतली. ६ जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी, त्याची आई आणि दोन मध्यस्थांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
पालघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोकभारती संस्थेच्या भरती अकादमी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीने मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने क्रीडा स्पर्धेत तिसरा पदक पटकावला मात्र क्षणाधार्त आयुष्य संपवल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.
Ans: पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: कातकरी आदिवासी समुदायातील.
Ans: सुमारे 3 लाख रुपयांमध्ये.






