Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव

ठाण्यात ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून 26 वर्षीय तरुणाची तब्बल 1.36 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. नंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करताच भामट्यांनी संपर्क तोडला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 01:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीच्या नावाखाली 26 वर्षीय तरुणाची 1.36 कोटी रुपयांची फसवणूक.
  • सुरुवातीला परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर विविध खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा करून घेतली.
  • ठाणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित वेबसाइट्स आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला.
ठाणे : ठाणे येथून एक सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला एक २६ वर्षीय तरुण बळी पडला. या तरुणाची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी शिताफीने जाळे विणून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

घडलेला फसवणुकीचा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत घडला. पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी सुरुवातीला टेलिग्राम/व्हॉट्सअॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाइन गेम खेळून आणि त्यात गुंतवणूक करून कमी वेळात दुप्पट-तिप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यानंतर भामट्यांनी त्याला तीन वेगवेगळ्या वेबसाइट्सवर नोंदणी करायला सांगितली होती. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्याला काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत तरुणाने भामट्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहारांद्वारे तब्बल 1.36 कोटी रुपये जमा केले. जेव्हा त्याने आपली मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेबसाइट चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच सर्व संपर्क तोडला.

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

सखोल तपास सुरु

या प्रकरणी ठाणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ वेबसाईट्स आणि विविध बँक खातेदारांसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा आणि संबंधित वेबसाईट्सच्या डिजिटल फूटप्रिंट्सचा सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन

कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा वेबसाइट जेव्हा बाजारातील दरापेक्षा अवाजवी परताव्याची हमी देते तेव्हा तो 100% घोटाळा असतो. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू नयेत. ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित तरुणाची किती रकमेची फसवणूक झाली?

    Ans: ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीच्या आमिषाने त्याची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली.

  • Que: फसवणूक कशाप्रकारे करण्यात आली?

    Ans: टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून भरघोस परताव्याचे आमिष दाखवत बनावट वेबसाइट्सवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

  • Que: पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी खात्यात पैसे पाठवू नयेत आणि फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाइन किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी.

Web Title: Thane crime 26 year old man swindled out of 136 crore with the lure of online gaming major scam by cyber fraudsters in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र
1

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
2

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
3

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास
4

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.