
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
28 डिसेंबर २०२५ रोजी रात्री तरुणीला तिच्या आईने फोन केला असता तिला त्याचं उत्तर मिळालं नाही. त्यानंतर, त्यानंतर कल्याणमधील अनुसूया निवास येथील तिच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर छताच्या हुकला लटकलेला तरुणीचा मृतदेह आढळला. पीडितेला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
त्यानंतर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी तिचा फोन आणि बँक स्टेटमेंट तपासले, ज्यामध्ये बऱ्याच बाबी उघडकीस आल्या. तिच्या शरीरावर सापडलेल्या खुणा आणि चॅट रेकॉर्डवरून आरोपीने तिच्यावर वारंवार हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने तिच्याकडून लाखो रुपये घेतले होते आणि 16 डिसेंबर २०२५ रोजी तिचं शेवटचं ट्रान्सझेक्शन झाल्याचं तरुणीच्या बँक अकाउंटवरून स्पष्ट झालं.
फोटो व्हायरल करण्याची धमकी
पोलिसांनी १० जानेवारीला २३ वर्षीय एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 108 अंतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मृत तरुणी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड 2020 पासून प्रेमसंबंधात होते. आरोपानुसार, तिच्या प्रियकराने तिला तिचे काही प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती आणि लग्न करण्यासाठी नकार दिला होता. इतकेच नव्हे तर, तो नुकतंच एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधात होता आणि त्यामुळेच, तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Ans: 28 डिसेंबर 2025 रोजी कल्याण (पूर्व) येथील तिच्या घरी.
Ans: प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, लग्नास नकार, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक.
Ans: मोबाईल चॅट्स, बँक स्टेटमेंट्स आणि शारीरिक जखमांचे पुरावे.