
crime (फोटो सौजन्य: social media)
काय म्हणाले कुटुंबीय?
पीडित तरुणाला त्याच्या प्रेयसीशी लग्न करायचं होत. या बद्दल त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. तेव्हा कुटुंबीय म्हणाले “आता तू 19 वर्षांचा आहेस, लग्न करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण होऊदेत.” या कुटुंबियांच्या बोलण्याला पीडित तरुणाला खूप वाईट वाटलं. याच नैराश्यात त्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ३० नोव्हेंबर २०२५ ला घडली. मृत तरुणाने घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलगा डोंबिवली शहरात राहत होता आणि त्याचे कुटुंबीय हे मूळचे झारखंड येथील रहिवासी होते. मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात अपघाती मृत्यू म्हणून प्रकरण दाखल केली असल्याचं सांगितलं जात आहे.
चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न; प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला
रेल्वे स्टेशनवर चॉकलेटचं आमिष दाखवून तीन मुलांच्या अपहरणाचा डाव प्रवाश्यांना उधळल्याचा प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय सुरजकुमार गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्ये रेल्वे वरील विठ्ठलवाडी स्टेशनवर 29 नोव्हेंबर रोजी घडली.
काय घडलं नेमक?
आरोपी सुराजकुमार गुप्ता हा स्टेशनवर मुलांना एकटे पाहून त्यांना चॉकलेटचं आमिष देऊन त्यांना फसवून जाण्याच्या तयारीत होता. ज्यावेळी त्याने मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवलं त्यावेळी त्यांच्या त्यांच्यातील एक मुलगी जोरजोरात रडू लागली.मुलीच्या रडण्याने स्टेशनवरील प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला हटकलं पण तो मुलांना स्वतःसोबत घेऊन जात होता आणि कथित स्वरुपात स्वतःच्याच म्हणण्यावर अडून बसला होता.आरोपी मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुलांकडून प्रवाशांना समजली तेव्हा त्यांनी आरोपी सूरजला चोप दिला आणि विठ्ठलवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?
Ans: कुटुंबियांनी लग्नासाठी अट घातल्याने तो मानसिक तणावात गेला आणि आत्महत्या केली.
Ans: ठाण्यातील डोंबिवली परिसरात ही घटना घडली.
Ans: मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.