Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

विश्रांतवाडीतील खासगी रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 02:59 PM
रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी
  • महिलेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
  • लाच घेताना महापालिकेचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे : विश्रांतवाडीतील खासगी रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. कारवाई न करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे सोसायटी, विमाननगर ) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका डॉ. महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

 

तक्रारदार डॉक्टर महिलेचे रुग्णालय विश्रांतवाडीतील धानोरीत आहे. संबंधित रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा तक्रार अर्ज पुणे महापालिकेच्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चकोर यांच्याकडे पाठविला होता. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे सोपविली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी डॉ. चकोर हे संबंधित रुग्णालयात चौकशीसाठी आले.

‘संबंधित रुग्णालयाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. त्रूटी आढळून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होईल. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच द्यावी लागेल’, असे डॉ. चकोर यांनी तक्रारदार डॉक्टर महिलेला सांगितले. त्यानंतर डॉ. चकोर यांनी तक्रारदार डॉक्टर महिलेकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली. नंतर महिला डॉक्टरला ३० हजार रुपये घेऊन नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी (२६ सप्टेंबर) बोलाविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. चकोर यांच्या दालनाच्या परिसरात सापळा लावून ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या डॉ. चकोर यांना पकडले.

हे सुद्धा वाचा : गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

डॉ. चकोर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ यांनी ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा  : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

Web Title: The acb has caught a pune municipal corporation medical officer while accepting a bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
1

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल
2

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
3

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
4

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.