Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

एकाच दिवशी शिरुर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदार लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही कारवाई बुधवारी झाल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 04:33 PM
एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा...

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा...

Follow Us
Follow Us:

पुणे : एकाच दिवशी शिरुर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदार लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली दोघांनी ही लाच मागितली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच दिवशी सापळा कारवाई करण्याची पहिलीच घटना शिरुर पोलिस ठाण्यात घडली. पहिल्या कारवाईत ११ हजार घेताना पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले तर, दुसर्‍या कारवाईत ९५ हजारांची लाच घेताना पोलिसाने पळ काढळा आहे. दोन्ही कारवाई बुधवारी झाल्या आहेत.

 

सतीश नाथाराव मुंढे (वय ४६) असे लाच घेऊन पळून गेलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. शिरुर पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार मुंढे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांने यासंदंर्भात एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने केलेल्या पडताळणीत मुंढे याने स्वत:साठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराकडून सतीश मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी त्याला सापळा पथकाची चाहूल लागली. लाच रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात असून शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई जुने शिरुर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरुर) असे पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे आई, वडिलांच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात (१९ ऑगस्ट २०२६) अतिक्रमण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शिवाजी बनकर याच्याकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकर याने तक्रारदारांकडे १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अटकेच्या भितीने बनकर याला ५ हजार रुपये दिले.

हे सुद्धा वाचा : मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

तक्रारदारांची एसीबीकडे तक्रार

पुन्हा दहा हजारांची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. याची एसीबीने पडताळणी केली. जुने शिरुर पोलिस ठाण्यात सापळा कारवाईत तक्रारदाराकडून ४ हजार रुपये घेण्याचे मान्य करुन उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिस हवालदार बनकर याला ११ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: The acb has taken action against two police personnel for accepting a bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe News
  • crime news

संबंधित बातम्या

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
1

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
2

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
4

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.