Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

आईच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 12:44 PM
१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

नांदेड : आईच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मात्र, कारवाईच्या वेळी तलाठी कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने लाचेची रक्कम स्वीकारली गेली नाही. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पालसाहेब आनंदराव मुंडे असे संबंधित तलाठ्याचे नाव असून, त्यांची (नंदनवन सज्जा, ता. कंधार) येथे तलाठी म्हणून नियुक्ती आहे. एका ३० वर्षीय तक्रारदाराच्या आईच्या नावावर मौजे नंदनवन येथील गट क्रमांक ३३६ मध्ये ०.५५ आर शेतजमीन आहे. सदर जमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी तो तलाठी मुंडे यांना भेटला होता. त्यावेळी मुंडे यांनी काम करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ४ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी दुपारी कंधार येथील तलाठी कार्यालयात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी मुंडे यांनी १२ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कार्यालयात उपस्थित नव्हते. तक्रारदाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले. पुन्हा १७ ऑगस्ट रोजी भेटीचे ठिकाण निश्चित करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंदच होता. संशय आल्याने मुंडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्चना करपूडे यांच्या पथकाने केली आहे. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Web Title: The anti corruption bureau has taken major action against a talathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe News
  • crime news

संबंधित बातम्या

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
2

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
3

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
4

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.