Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच स्वीकारणं भोवलं; ACB ने केली ‘ही’ मोठी कारवाई

सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2025 | 06:23 PM
अधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच स्वीकारणं भोवलं; ACB ने केली ‘ही’ मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

कराड : सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली आहे.

कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (वय ४०, रा. कार्वे नाका, कराड) यांच्यासह अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे कराड शहरातील सोमवार पेठ येथे पार्किंग व पाच मजली इमारतीचे काम प्रास्ताविक आहे. तक्रारदार यांनी इमारत बांधकाम परवानगी मिळण्याबाबत २०१७ मध्ये नगरपरिषद येथे प्रकरण दिले होते. त्याची मुदतवाढ २०१९ पर्यंत घेण्यात आली होती. सदरचे काम सुरू न झाल्याचे पुन्हा २०२१ मध्ये सुधारीत परवानगी मिळाली. परंतु, दरम्यानच्या काळात नियमावलीत बदल झाल्याने सुधारीत बांधकाम परवाना मिळण्याबाबत पुन्हा २०२३ मध्ये अर्ज दाखल केला होता. या कामाच्या परवानगी करीता तक्रारदार यांनी सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी खासगी व्यक्ती अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदार यांना भेटून १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

पदाचा गैरवापर करत केली लाचेची मागणी

शिरगुप्पे याने अजिंक्य देव याच्या मदतीने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच तौसिफ शेख याने शिरगुप्पे याच्या सांगण्यावरून मुख्याधिकारी कार्यमुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या नावाचे स्वाक्षरी करत चलन तयार केले. पाठीमागील तारखेचे जावक करून अजिंक्य देव याच्या सांगण्यावरून पहिला हप्ता म्हणून पाच लाखांची रक्कम स्वीकारली. चौघांनी तक्रारदार यांना त्यांच्या प्रलंबित कामाकरीता आपल्या पदाचा गैरवापर करीत लाच मागणी करून, प्रोत्साहन दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: The anti corruption bureau has taken major action in the case of accepting a bribe of rs 5 lakh nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Bribe News
  • cmomaharashtra
  • Karad Crime
  • Karad Police
  • maharashtra
  • Satara Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
1

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
2

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती
3

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?
4

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.