संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शौर्यला भेटण्यासाठी बोलावले होते. सोमवारी संध्याकाळी भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शौर्य तेथे पोहोचल्यानंतर हल्लेखोरांचे टोळके त्याच्यासोबत काही वेळ बोलत थांबले. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काहीजण शौर्यला भेटण्यासाठी बोलावत होते. मात्र, जुना वाद पुन्हा उफाळू नये म्हणून तो त्यांच्या भेटीला जाणे टाळत होता. सोमवारी मात्र हल्लेखोरांनी त्याला बोलावून घेत त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर संबंधितांचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना!
वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व दांड्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात मंगेश दिलीप चव्हाण (वय २७, रा. स्नेहल नगर, अभ्यंकर वार्ड, चंद्रपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Ans: जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने १७ वर्षीय शौर्य मोहिते याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
Ans: शौर्य आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून त्याला भेटायला बोलावून हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
Ans: डेक्कन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.






