Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

डछाड काढणाऱ्या तरुणांना पालकांनी समज दिल्यानंतर देखील शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगर परिसरात घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2024 | 02:54 PM
शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : छेडछाड काढणाऱ्या तरुणांना पालकांनी समज दिल्यानंतर देखील शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगर परिसरात घडला आहे. मुलीला शाळेच्या वर्गातून बोलवून जबरदस्तीने गाडीवर बसवून नेत तिच्याशी अश्लील कृत्य करण्यात आले. तर, तिला आणि तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी १८ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. याबाबत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडीत मुलगी एका शाळेत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून तिचा एक मुलगा पाठलाग करत होता. मुलीला अडवून “तू मला आवडते. माझ्यासोबत बोलली नाही, तर समाजात तुझी बदनामी करेल”, अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे मुलीने पालकांना याची माहिती दिली होती. पालकांनी मुलाला व त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका मुलाला समज दिली. शनिवारी (७ डिसेंबर) पिडीत मुलगी शाळेत होती. तेव्हा दोघे शाळेत गेले. मुलीला शाळेबाहेर बोलाविले. मुलीला दुचाकीवरुन शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यांनी मुलीशी अश्लील कृत्य केले. दुसऱ्याने मोबाइलवर फोटो काढले. नंतर तिला कोणाला काही सांगितल्यास सोशल मिडीयात फोटो व्हायरल करू तसेच तुला आणि तुझ्या भावाला जिवे मारू अशी धमकी दिली. त्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तरुणीला VIDEO व्हायरल करण्याची भिती दाखवली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या कार चालकावर गुन्हा

आयशर टेम्पोचा कारला धक्का लागल्यानंतर डाव्या बाजूचा काच फुटला. तेव्हा चालकाला जाब विचारत असताना आयशर टेम्पो चालकाने दाम्पत्याला शिवीगाळ केली. तसेच, महिलेला धक्काबुक्की केल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय चालकावर विनयभंग तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. कल्याणीनगर भागातून रविवारी (८ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे शहर तसेच उपनगरात अल्पवयीन मुलींसह महिलांची छेडछाड काढणे तसेच अश्लील कृत्य करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. शाळा परिसरात कोणी छेड काढली किंवा अश्लील कृत्य केल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The case of 2 boys abusing a school girl has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
3

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.