Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे जुलै २०२० मध्ये घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज बारामती न्यायालयाने दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 06:44 PM
खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Follow Us
Follow Us:

​बारामती : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे जुलै २०२० मध्ये घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज बारामती न्यायालयाने दिला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार याला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.

 

​खटल्याच्या हकीकतीनुसार, ३० जुलै २०२० रोजी खुटबाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे ही घटना घडली होती. आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार (रा. सदगुरू कॉलनी, वेणूनगर, वाकडरोड, वाकड, ता. हवेली, जि. पुणे) याने मनिषा जाधव आणि गुलचंद निकम यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना लाकडी काठी व लोखंडी कोयत्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी करून त्याने दोघांचाही खून केला होता.

​हत्या केल्यानंतर आरोपीने तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आपले खरे नाव लपवून खोटे नाव सांगितले होते. या प्रकरणी फिर्यादी पोपट बाबूराव कांबळे यांनी ३१ जुलै २०२० रोजी यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गु.र.नं. ७४७/२०२० अन्वये भा.द.वि. कलम ३०२, १७६ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.​

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी कोर्टात सबळ पुरावे सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, यामध्ये ​भा.द.वि. कलम ३०२ (खून): जन्मठेप (सश्रम कारावास) आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद,भा.द.वि. कलम १७६: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा,​भा.द.वि. कलम १७७: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या साक्षीदार क्र. ८ बालाबाई देवीदास जाधव यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरली. आरोपीने दोन्ही मृत व्यक्तींना लोखंडी कोयता आणि लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारल्याचे न्यायालयाने मान्य केले. तपास अधिकारी बी. एन. पाटील यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सागर माने यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस नाईक वेणूनाद ढोपे, कोर्ट पैरवी गोरख कस्पटे व सहाय्यक फौजदार ए. जी. कवडे यांनी सहकार्य केले.

Web Title: The court has handed down a severe sentence to the accused in the khutbav double murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Daund Crime

संबंधित बातम्या

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
2

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
3

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
4

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.