Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांगले (ता. शिराळा) येथील मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३५) याला ईश्वरपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2026 | 12:28 PM
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

Follow Us
Follow Us:

ईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांगले (ता. शिराळा) येथील मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३५) याला ईश्वरपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला आहे. मंगेश कांबळे आणि प्राजक्ता यांचा सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर ते पनवेल येथे राहत होते. त्यांना शिवम आणि शिवण्या अशी दोन मुले आहेत.

नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

काही दिवसांसाठी मंगेश कुटुंबासह मांगले येथे आई व भावाकडे आला होता. याच काळात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मंगेशकडून तिच्याशी वारंवार वाद होत होते. २७ मार्च २०२५ रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात झाले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने प्राजक्ताचा मृतदेह दुसऱ्या खोलीतील पत्र्याच्या पेटीत ठेवला. पेटी बंद करून खोलीला कुलूप लावले आणि तो तेथून निघून गेला. दरम्यान, प्राजक्ता घरातून निघून गेल्याचे सांगून आरोपीने नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेचा महत्त्वाचा धागा ठरला तो प्राजक्ताचा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा शिवम.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; संतोष पंडितांना अटक, ‘हीच आमची लायकी’ म्हणत मोबाईल-बेल्ट कुटुंबीयांकडे दिला

सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

शिवमच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला होता. त्याने नातेवाईकांना घडलेली घटना सांगितल्यानंतर प्राजक्ताच्या बेपत्ता होण्यामागील सत्य समोर आले. नातेवाईकांनी मंगेशला शिराळा पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १६ साक्षीदार तपासले. यामध्ये मयत प्राजक्ताची आई रंजना, अर्जुन चांदणे, प्रत्यक्षदर्शी मुलगा शिवम कांबळे, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरुद्ध काकडे तसेच तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

Web Title: The court has handed down a severe sentence to the husband in the case of his wifes murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड
2

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
4

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.