Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

डेक्कन परिसरातील एका हॉटेलात आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिक अशोक जैन यांची १५ कोटी रुपयांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या चौघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 05:42 PM
आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Follow Us
Follow Us:

पुणे : डेक्कन परिसरातील एका हॉटेलात आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिक अशोक जैन यांची १५ कोटी रुपयांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या चौघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. कथित आर्थिक फसवणूक, मृताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेत आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. उदगांवकर यांनी आदेशात नोंदविले.

 

नथुसिंग राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवानसिंग राजपुरोहित आणि प्रल्हादराम चौधरी यांचा जामीन फेटाळण्यात आला. अशोक मिलापचंद जैन (वय ६१) यांनी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. त्यांच्या अंगावर ओरखडे आणि जखमा आढळून आल्या आहेत; तसेच त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. जैन यांच्या मुलाने याबाबत डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे.

बांधकाम प्रकल्पाच्या व्यवहारात आरोपींनी अशोक जैन यांचे १५ कोटींचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. गुन्ह्याचा तपास सुरू असून, शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण विषबाधा आणि शरीरावरील बोथट आघात असल्याचे नमूद केले आहे. मृताच्या शरीरावर सुमारे १३ ते १४ जखमा आढळून आल्या आहेत. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा : मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर…; सपकाळांची टीका

आत्महत्यापूर्व चिठ्ठी हा महत्त्वाचा पुरावा असून, आरोपींनी केलेल्या कथित आर्थिक फसवणुकीचा आणि आत्महत्येचा थेट संबंध आहे का, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लागू होतो का, याचा विचार सुनावणीदरम्यान करावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आरोपींना १५ दिवसांनंतर नियमित जामीनासाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी…; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

Web Title: The court has rejected the bail application of the accused in the case involving the suicide of a construction developer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.