रेल्वे स्टेशन परिसरात 'MD' विकणाऱ्या सराईताला बेड्या (Photo Credit - X)
अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल
शेख मिजान शेख नईम (२७, रा. गल्ली क्रं., सिल्कमिल कॉलनी, रेल्वे स्टेशन) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ०.८९ ग्रॅम एमडी, अॅपलचा मोबाइल, एक रेल्वे तिकिट आणि दोन चाव्या असा सुमारे ६५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर त्याचे साथीदार कैफ कुरेशी (रा. मदनी चौक, रोशनगेट) आणि मस्तान आरिफ (रा. भिवंडी, मुंबई) हे दोघे पसार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ प्रतिबंधक पथकास माहिती मिळाली की, सिल्कमिल कॉलनीतील हमालवाडा रोडवरील रेल्वेस्टेशन वालकंपाउंड भिंतीलगत शेख मिनाज हा त्याच्या साथीदारासह एमडी पावडरची विक्री करत आहे. या माहिती आधारे सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, हलवादार लाला पठाण, सतिष जाधव, विजय ञिभूवन, नितेश सुंदर्डे, गणेश काळे यांच्या पथकाने सापळा रचून रात्री सुमारे १०.३० वाजता दोन संशयित घटनास्थळी आढळून आले.
हे देखील वाचा: निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी छापा टाकताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक कैफ कुरेश हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर शेख मिजान याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ०.८९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.
याशिवाय त्याच्याकडून एक अॅपल कंपनीचा आयफोन, दादर-मनमाड रेल्वे तिकीट, दोन धातूच्या चाव्या व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एकिलवाले हे करत आहेत.
मिजान हा सराईत
मिजान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सातारा, क्रांतीचौक व जालना जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अमली पदार्थ, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्ञ बागळणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे देखील वाचा: पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा






