Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला दांडक्याने मारहाण; पळून जाताना पाठलाग केला अन्…

रात्री शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2024 | 01:16 PM
शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला दांडक्याने मारहाण; पळून जाताना पाठलाग केला अन्...

शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला दांडक्याने मारहाण; पळून जाताना पाठलाग केला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं अता रात्री शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तो पळून गेला असताना त्याचा पाठलाग करुन घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांची नासधुस करण्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला आहे. याप्रकरणी करण भानुदास आगलावे (वय २०, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अफ्रिदी शेख, सुफियान शेख, शहादाब शेख, अबु शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल शेंडगे, गणेश खानविलकर हे लोहियानगर येथे शेकोटी करुन बसले होते. करण आगलावे रात्री साडेबारा वाजता शेकोटीच्या इथे येऊन गप्पा मारु लागले. त्यावेळी आफ्रिदी ऊर्फ बुढ्ढा शेख हा त्यांच्याकडे आला. शिवीगाळ करुन तो मारहाण करुन लागला. तेव्हा करण व इतर सर्व गल्लीत घुसले. त्यांच्या मागोमाग टोळके आले. ते लाकडी दांडके घेऊन करण याला मारहाण करु लागले. तेव्हा ते राहुल शेंडगे याच्या घराजवळ लपून बसले. त्यावेळी सर्व जण शेंडगे यांच्या घरासमोर येऊन राहुल कुठे आहे, अशी विचारणा करीत घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांची नासधुस केली. नंतर ते शिवीगाळ करत तेथून निघून गेले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी मागितली लाच; वाचा संपूर्ण प्रकरण

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन तरुणांवर कोयत्याने वार

गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: The incident of beating a young man with a stick has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
2

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
3

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
4

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.