Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी…; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी हातपाय तोडण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सावकाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 01:41 PM
माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी...; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी...; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी हातपाय तोडण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्या सावकाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

 

शुभम शामराव थोपटे (वय ३०, रा. शुक्रवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खंडणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत लोहीयानगर भागातील ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही घटना मे २०२४ ते १० जून २०२६ या कालावधीत घडली आहे.

हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आरोपी थोपटे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. नंतर तक्रारदारांनी मुद्दलासह १० टक्के व्याजापोटी एकूण १ लाख ९० हजार रुपये परत केले. मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही आरोपीने आणखी १ लाख ३० हजार रुपयांची मागणी करत पैशांसाठी तगादा लावला. तसेच, “माझे पैसे वेळेत दिले नाहीत तर तुझे काही खरं नाही, हातपाय मोडन टाकीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी अखेर खडक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी थोपटेला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन, धक्कादायक कारणही समोर; चिठ्ठीत कंपनीतील महिलांचे नाव

महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर रशिद शेख (वय ३२), हैदर रशिद शेख (वय ३४, दोघेही रा. कलवड) तसेच अन्वर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शांतिरक्षक सोसायटीच्या गेटसमोर घडली आहे.

Web Title: The khadak police have arrested a moneylender for issuing threats to recover money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
1

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
2

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
3

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…
4

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.