Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर चोरट्याच्या बँकॉकमधून आवळल्या मुसक्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिस स्टेशनने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश करत थायलंडमधील बँकॉक येथून एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 06:21 PM
सायबर चोरट्याच्या बँकॉकमधून आवळल्या मुसक्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची मोठी कारवाई

सायबर चोरट्याच्या बँकॉकमधून आवळल्या मुसक्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिस स्टेशनने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश करत थायलंडमधील बँकॉक येथून एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. रेड कॉर्नर नोटीस, लुकआऊट सर्क्युलर (एलओसी) आणि इंटरपोलच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन टास्क स्कॅम, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक आणि डिजिटल अरेस्टसारख्या सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.

 

दीपक गाडे उर्फ सोमेश उर्फ गणेश बाळासाहेब काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या ऑनलाइन टास्क स्कॅम आणि शेअर मार्केट फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी यापूर्वी १३ आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून दुबईस्थित दीपक गाडे उर्फ सोमेश उर्फ गणेश बाळासो काळे याचे नाव समोर आले. तो भारतातील विविध बँक खात्यांची माहिती गोळा करून सायबर गुन्ह्यांमधून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी ‘म्युल अकाउंट्स’चे जाळे उभे करत असल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान आरोपीने दुबईमध्ये बसून सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि विविध एजन्सींशी समन्वय साधत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीच्या प्रत्यर्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर इंटरपोलच्या माध्यमातून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. तसेच देशाबाहेरून भारतात येण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ताब्यात घेता यावे यासाठी लुकआऊट सर्क्युलर देखील जारी करण्यात आले.

दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी दुबईहून थायलंडमधील बँकॉक येथे पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांनी इंटरपोल आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर तो थायलंडमधून अन्य देशात जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सायबर पोलिसांच्या पथकाने त्याचा अधिकृत ताबा घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

चिनी नागरिकांच्या संपर्कात

पोलिस तपासात आरोपी चीनसह इतर परदेशी नागरिकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना ऑनलाइन टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गंडा घालत होता. या टोळीने देशभरातील अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय असून आरोपीच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन, धक्कादायक कारणही समोर; चिठ्ठीत कंपनीतील महिलांचे नाव

उघडकीस आलेले गुन्हे

नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई, मालवणी पोलीस ठाणे, मुंबई प्रत्येकी एक गुन्हा, सायबराबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा राज्य दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे पोलस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : 400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ

Web Title: The pimpri chinchwad police have taken major action by arresting a cyber thief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
1

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
2

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
3

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
4

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.