Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानठळ्या बंदच! कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवर कारवाई; तब्बल 22 बुलेट…

लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेत २२ बुलेट ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचे सायलेन्सर काढून टाकत त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2025 | 03:15 PM
कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवर कारवाई; तब्बल 22 बुलेट...

कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवर कारवाई; तब्बल 22 बुलेट...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात मुख्य रस्त्यांसह उपनगरात बुलेटला अल्टर करून सायलेन्सर बसवून त्यातून कर्ण कर्कश्य आवाज काढत बुलेट पळविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकट्या लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेत २२ बुलेट ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचे सायलेन्सर काढून टाकत त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याप्रमाणेच पुर्ण शहरात अशा बुलेटस्वारांवर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर ४ पथके तयार केली होती. लोणी काळभोर परिसरामधील वेगवेगळ्या भागात पोलीस नेमण्यात आले. मॉडिफाइड सायलेन्सर, विना नंबरप्लेट अशा एकूण २२ बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आला. या गांड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. तसेच वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत त्यांच्यावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनांचे मुळे सायलेन्सर बसवून तसेच ज्या गांड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

शहरभर कारवाईची गरज

लोणी काळभोर प्रमाणेच पुण्याच्या मुख्यभाग तसेच उपनगरात देखील अश्याच पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे तरुण बुलेटचा आवाज काढत फिरत असल्याचे पाहिला मिळते. कर्णकश आवाजाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सुसाट गाडी चालविताना नागरिकांच्याच मनात धडकी भरते. रात्रीअपरात्री हे प्रमाण मोठे असते. शहरात विशेष अभियान राबवून अशा गाड्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

पुणे शहरभर बुलेटला मॉडीफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढत फिरणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीही दंडूका उगारला होता. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या तब्बल ६१९ दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. २७ वाहतूक विभागाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यासोबतच यात दुचाकीचे सायन्सर मॉडीफाय करून देणार्‍या ३१६ जणांवर देखील कारवाई करण्यात आली. तर दुचाकींचे सायलन्सर मॉडीफाईड करणार्‍या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सायलन्सर विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. पुन्हा अशा बुलेट आढळून आल्यामुळे पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

Web Title: The police has taken action on the bullet that makes a loud noise nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Arrested
  • Bullet Bike
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
3

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.