Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६१) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 01:38 PM
गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Follow Us
Follow Us:

वरवंड : पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणि यवत पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर लिंगनिदान व की स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत केडगाव येथील या पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६१) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४३) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तो कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना बोगस डॉक्टर म्हणून हे काम करत होता.

 

या तपासात उघड झाल्यानुसार, तो पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गभार्तील लिंगनिदान करत होता. गर्भ मुलीचा असल्याचे समजताच संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या तपासात डॉ. संगीता गायकवाड या त्यांच्या रुग्णालयात कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून अशा महिलांचे बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार १७ जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ९१, ३ (५), ८८ तसेच पीसीपीएनडीटी कायदा आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम अंतर्गत विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : आई- वडिलांकडे दुर्लक्ष, काहींनी पत्नीच्या नावे केल्या जमिनी; पुरंदर विमानतळावरुन कौटुंबिक वादांचे प्रकार

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने आणि बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व विशेष तपास पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसआयटी आणि यवत पोलीस संयुक्तपणे करत असून, अशा बेकायदेशीर आणि अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : वनविभागाची मोठी कारवाई; राखीव वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचा केला पर्दाफाश

Web Title: The police have arrested a female doctor from kedgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
2

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.