Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हा हॉटेलपासून सुरू झालेल्या पाठलाग तसेच एक कोटीच्या दरोडा प्रकरणात शुक्रवारी नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याला (दि.२४) अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 03:03 PM
पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हा हॉटेलपासून सुरू झालेल्या पाठलाग तसेच एक कोटीच्या दरोडा प्रकरणात शुक्रवारी नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याला (दि.२४) अटक केली आहे. तर राजगड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलिस चौकीत नेमणूकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलिस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री या दोघांना सहआरोपी करण्यात आले आहे. दोघे पोलिस सद्या फरार असून, अटकेनंतर तिवारी याला न्यायालयाने २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात दोघा पोलिसांना सहआरोपी करण्यात आल्याने पुणे ग्रामिण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

 

याप्रकणात याअगोदर विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६), गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी याबाबत हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. कृष्णकृपा अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी नर्‍हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

भरदुपारी दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर पोलिस असल्याचे सांगून हर्षवर्धन पवार यांच्याकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे, विक्रम चाकणकर याच्या कारमध्ये बसून नऱ्हे येथील एचडीएफसी बॅंकेच्‍या दिशेने नवले ब्रिजवरून जात होते. त्‍यावेळी अचानकपणे दुचाकीरून काही जण आले त्‍यांनी कारला त्‍यांच्‍या दुचाक्या आडव्या घातल्‍या. यावेळी अमेय कार्ले हा कारजवळ येऊन, “आम्ही पोलिस आहोत. तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात, याची आम्हाला माहिती आहे,” असे सांगत कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी कारमधील हिरव्या रंगाची बॅग आणि आणखी एक बॅग ज्‍यात एकूण एक कोटी रुपये होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आपटे ७३ लाख ५० हजार रुपयांची पिशवी असलेली बॅग घेऊन खाली उतरले. नंतर पवार यांना घेऊन कार थेट खेडशिवापूर पोलिस चौकीत गेली होती.

व्यावसायिक पवार यांना आरोपी खेडशिवापूर पोलिस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलिस हवालदाराने तोतया पत्रकाराच्या साथीने बॅगेतील २० लाख रुपये काढून घेतले. राहिलेले साडेसहा लाख रुपये मुद्देमालात दाखविण्याचा त्यांचा डाव होता. मात्र हा प्रकार राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडला आणि हा प्रकार समोर आला. व्यावसायिकाच्या बॅगेतून काढलेली रोकड तोतया पत्रकाराने आपल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. ती रोकड काढून देण्यास महिला पोलिस हवालदाराने मदत केली असा त्यांच्यावर आरोप आहे. खेडशिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र, त्यांच्या या कृत्याचा सर्व प्रकार समोरील एका हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. याबाबतच गोपनिय अहवाल पोलिस निरीक्षक जाधव यांनी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्याकडे सादर केला होता. तसेच या प्रकरणाच्या अनुषंगाने असलेले सीसीटीव्ही फुटेज जाधव यांनी नऱ्हे पोलिसांना दिले होते. नंतर चौकशीअंती ही कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असताना, आरोपी व्यवसायिकाला खेडशिवापूर पोलिस चौकीत का घेऊन गेले असे अनेक सवाल याबाबत उपस्थित केले जाऊ लागले होते. तसेच या कारच्या संदिग्ध हालचाली देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा : देशाचे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी नेमके किती शिकले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: The police have arrested a journalist in connection with a robbery case worth one crore rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.