Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur Crime : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

इंदापूर तालुक्यातील कालठण येथे अवैधरित्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 17, 2026 | 12:30 AM
इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कालठण येथे अवैधरित्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून गावठी पिस्तूल, मॅगझिन आणि ७ जिवंत काडतुसे असा २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन उर्फ सोन्या महेंद्र चव्हाण (वय २२, रा. कालठण नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे) हा विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी रविवारी (दि. १४) दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून आरोपला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, एक मॅगझिन आणि ७ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील तसेच पोलीस अंमलदार गणेश डेरे व तुषार चव्हाण यांचा सहभाग होता.

हे सुद्धा वाचा : भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

Web Title: The police have arrested a youth in indapur taluka for possessing a country made pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Indapur Crime
  • indapur news

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
2

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
3

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
4

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.