Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

करडे (ता. शिरूर) येथे सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत परजिल्ह्यातून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 06:14 PM
सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

शिरूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. करडे (ता. शिरूर) येथे सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत परजिल्ह्यातून अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास करडे गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे भैरवनाथ मंदिराजवळील तलाव परिसरात जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला. आरोपींनी निखिल सतीश थेऊरकर (वय २३, रा. करडे) याला शिवीगाळ व दमदाटी करून पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार केला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६९/२०२६ दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके (वय १९), रोहन उर्फ दादया गणेश पंचमुख (वय १९), अदित्य दशरथ लंघे (वय १९), निखिल विलास कायस्थ (वय१९) आणि सनी परमेश्वर मस्के (वय २०) यांना अटक करण्यात आली. अथर्व शेळके व रोहन पंचमुख यांच्यावर यापूर्वी पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात पूर्वीच्या मारहाणीच्या रागातून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात किरकोळ वादातून चुलत काकाने पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: The police have arrested five accused persons for attempting to murder a man by opening fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shirur News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.