Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

मैत्रीणीच्या कारणातून मित्रानेच मित्राचा आपल्या साथीदारांना सोबत घेऊन लाकडी दांडके, बॅटने मारहाण करून खून केल्याची घटना गोखलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 12:30 AM
'या' कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

'या' कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

Follow Us
Follow Us:

पुणे : मैत्रीणीच्या कारणातून मित्रानेच मित्राचा आपल्या साथीदारांना सोबत घेऊन लाकडी दांडके, बॅटने मारहाण करून खून केल्याची घटना गोखलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघा आरोपींना नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बारा तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. हर्षद मच्छींद्र जाधव (वय. २० ,रा. शकुंतला गार्डन शेजारी गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अभिषेक संतोष पवार (वय. २०), प्रथमेश धोत्रे (वय. २१)  आणि मारुती देवकर (वय. २८, तिघे राहणार जनवडी) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास एकतानगर सोसायटी भगवान चाळ गोखलेनगर येथे घडली आहे. याबाबत हर्षद याची आई पोर्णिमा जाधव (वय. ४०) यांनी फिर्याद दिली आहे.

 

महिन्यापूर्वी झाले होते वाद

याबाबत पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांनी सांगितले, हर्षद आणि आरोपी अभिषेक पवार हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. हर्षद याचा आणखी एक मित्र असून, त्याची एक मैत्रीण आहे. त्या मैत्रीणीच्या कारणातून अभिषेक आणि हर्षद या दोघांत गेल्या काही महिन्यात वाद झाले होते. हर्षद याने अभिषेक याच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता. तसेच त्याला पाहून घेण्याची धमकी दिली होती. त्यामळे अभिषेक हा हर्षद याच्यावर चिडून होता. त्याच कारणातून त्याने आपल्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन हर्षद याला गुरूवारी (दि. १८) पहाटे अडीचच्या सुमारास गाठले. त्यावेळी हर्षद हा आपल्या घरासमोरील एका रिक्षात मोबाईल पहात बसला होता. तिघांनी त्याला लाकडी दांडके आणि बॅटने बेदम मारहाण केली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प

रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

हर्षद याचा मित्र यश याने त्याच्या कुटूंबियांना ही माहिती दिली. हर्षदच्या कुटूंबियांनी बाहेर धाव घेतली. त्याचे आई-वडीलांनी पाहिले असता, हर्षद हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला होता. तेवढ्यात पोलिस देखील घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी हर्षद याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या डोक्यात आरोपींनी मारहाण केली होती. हर्षदवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी पुण्यातून पळ काढला होता. चतुःश्रृंगी पोलिस, गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. अखेर चतुःश्रृंगी पोलिसांना हे तिघे नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त चुलमूला रजनीकांत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तमकुमार भजनावळे, गुन्हे निरीक्षक स्नेहल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने केली.

Web Title: The police have arrested the accused who murdered a young man from gokhlenagar pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
1

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
2

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
3

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
4

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.