Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारचोरी प्रकरणाचा लागला छडा, पोलिसांनी निजामाबादहून आरोपीला ठोकल्या बेड्या; साथीदार फरार

तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तुळजापूर व सोलापूर येथून चोरीस गेलेल्या दोन स्विफ्ट डिझायर कारांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कारचोराला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 11:30 AM
कारचोरी प्रकरणाचा लागला छडा, पोलिसांनी निजामाबादहून आरोपीला ठोकल्या बेड्या; साथीदार फरार

कारचोरी प्रकरणाचा लागला छडा, पोलिसांनी निजामाबादहून आरोपीला ठोकल्या बेड्या; साथीदार फरार

Follow Us
Follow Us:

तुळजापूर : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या वाहनावरदेखील डल्ला मारत आहेत. अशातच आता तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तुळजापूर व सोलापूर येथून चोरीस गेलेल्या दोन स्विफ्ट डिझायर कारांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कारचोराला अटक केली आहे. तेलंगणातील निजामाबाद येथून दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून, आरोपीला तुळजापूर पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी सुरु केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील जितेंद्र मधुसूदन भूमकर यांच्या नातेवाईकांची अंदाजे ७ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर (एमएच-१२ आरके-६३११) ही कार दिनांक १४ मे २०२६ रोजी नळदुर्ग रोडवरील विठ्ठल पतसंस्थेसमोर उभी असताना चोरीस गेली होती. त्याचप्रमाणे दिनांक १९ मे २०२६ रोजी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक स्विफ्ट डिझायर कार चोरीस गेली होती. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तुळजापूर व फौजदार चावडी पोलिसांनी संयुक्तपणे तांत्रिक विश्लेषण केले.

टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज, फास्टॅग व्यवहारांची माहिती तसेच मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान समद मेहमुद शेख (रा. निजामाबाद, तेलंगणा) याचे नाव समोर आले. पोलिसांनी दिनांक ६ जून २०२६ रोजी निजामाबाद येथे कारवाई करून दोन्ही स्विफ्ट डिझायर कार जप्त केल्या आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गाडीची काच फोडून साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील दुसरा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपीला तुळजापूर पोलीस ठाण्यात आणून चार दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार संतोष कारवार तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार साथीदाराला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे-बेंगलोर हायवेवर भीषण अपघात; मिनी बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

तुळजापूरातील अन्य वाहनचोरींचाही उलगडा होणार?

निजामाबाद येथील आरोपी सदन मेहमुद शेख याला अटक केल्यानंतर तुळजापूर शहर व परिसरात यापूर्वी घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचे समजते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनांच्या गुन्ह्यांशी त्याचा किंवा त्याच्या टोळीचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपीच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असून, पुढील चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The police have arrested the accused who stole the car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.