Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, दुचाकीस्वार दाम्पत्याला धमकावून त्यांना लुटल्याची घटना कात्रज घाटात घडली आहे. पसार झालेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 03:22 PM
कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता दुचाकीस्वार दाम्पत्याला धमकावून त्यांना लुटल्याची घटना कात्रज घाटात घडली आहे. पसार झालेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तौहिद असला शाह (वय २३), सुलेमान यासीन शेख (वय २१), रोहित बबलू सिंग (वय २०, तिघे रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली. याबाबत एकाने आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे खेड शिवापूर येथे राहायला आहेत. अंगारकी चतुर्थी असल्याने तक्रारदार व त्यांची पत्नी मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुचाकीवरून पहाटे साडेचारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. कात्रज घाटातून ते दुचाकीवरून पुण्याकडे येत होते. जुन्या कात्रज बोगद्याजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वार तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला अडवले. चोरट्यांनी त्यांना धमकावले.

दुचाकीची चावी चोरट्यांनी ताब्यात घेतली. नंतर चोरट्यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. घाबरलेल्या दाम्पत्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या शिक्षिका आहेत. २८ सप्टेंबर रोजी त्या सकाळी पावणेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानक परिसरातून पीएमपी बसने टिळक रस्त्याकडे निघाल्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, मोबाइल संच, रोकड असा ४८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक शेंडे तपास करत आहेत.

Web Title: The police have arrested the thieves who robbed a couple near the katraj tunnel nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
1

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
2

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!
3

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.