Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

पुणे रेल्वे स्थानकातील बुकिंग क्लार्कवर (सीसीटीसी) चाकूने वार करुन लुटमार करणार्‍या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतून अटक केली आहे. पोलिसांनी या भागातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींना पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 03:01 PM
पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील बुकिंग क्लार्कवर (सीसीटीसी) चाकूने वार करुन लुटमार करणार्‍या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतून अटक केली आहे. पोलिसांनी या भागातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चाकणला जाण्यासाठी लाईनमध्ये आल्यानंतर सीसीटीसीने आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून हल्ला केल्याचे समोर आले आहे.

जितेंद्र मोतीराम राठोड (वय २४ रा. चाळीसगाव, डोंबिवली) ईश्वर गोरख चव्हाण (वय २३ रा. दसनाबाद,  संभाजीनगर, सध्या- डोंबिवली) अजय मदन चव्हाण (वय २५ रा. डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना १८ ऑगस्टला रात्री एकच्या सुमारास तिकीट विक्री केंद्राजवळ घडली होती. ही कारवाई उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश आव्हाड, निलेश पालवे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे, महेश जाधव, युवराज गायकवाड यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.

तक्रारदार हे पुणे स्टेशनवर वरिष्ठ बुकिंग क्लार्क असून, १८ जुलैला रात्रपाळीला काम करीत होते. तेव्हा एकच्या सुमारास आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर चाकूने वार करून दोन मोबाइल, सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पथकाने १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढला होता.  आरोपी हे भोपरगाव कमानी, डोंबिवलीतील असल्याची माहिती पोलिस अमलदार प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन २१ ऑगस्टला तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

१५० सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी दाखवली वाट

लुटमारीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी बंडगार्डन तपास पथकाने आजूबाजूच्या १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे फोटो मिळवून आरोपींचा माग काढला. त्यानंतर खबर्‍यांच्या माहितीनुसार पथकाने त्रिकुटाला अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाइल, सोन्याची चैन जप्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात गणेशाेत्सव निर्बंधमुक्त! प्रशासन सकारात्मक; पोलिस प्रशासनाला महापौरांची सूचना

जीआरपीएफची चालढकल..!

रेल्वेच्या आवारात घटना घडल्यानंतर देखील जीआरपीएफने याप्रकरणाची दखल घेतली नाही. कारवाई करण्यासाठी चालढकल केली आणि गुन्हा नोंदवण्यासाठी बंडगार्डन पोलिस पाठविले. त्यामुळे काही दिवस वेळ आरोपींना मिळाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: The police have arrested three individuals who attacked a cctc clerk with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
3

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.