Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

गर्दीच्या ठिकाणांहून बनावट चावीने दुचाकी चोरणाऱ्या दोघांसह चोरीच्या गाड्या विक्रीसाठी घेणाऱ्या गॅरेजचालकाला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या टोळीचा माग काढला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2026 | 11:47 AM
दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

Follow Us
Follow Us:
  • दुचाकी चोरणाऱ्या दोघांसह गॅरेजचालकाला अटक
  • ५० सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी छडा लावला
  • आरोपींकडून आठ चोरीच्या दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : गर्दीच्या ठिकाणांहून बनावट चावीने दुचाकी चोरणाऱ्या दोघांसह चोरीच्या गाड्या विक्रीसाठी घेणाऱ्या गॅरेजचालकाला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या टोळीचा माग काढला. आरोपींकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शेख जुनेद शेख समी (वय २४), परवेज सय्यद आमीर (वय २५) आणि गॅरेजचालक शेख जमीर शेख लतीफ (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत.

 

आंबेडकरनगर येथील परमेश्वर श्रीराम रोठे (वय ४१) यांची दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी ५ जुलै रोजी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटली. जुनेद आणि परवेज हे बांधकामावर स्लॅब टाकण्याचे काम करतात. गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या जुन्या दुचाकींवर पाळत ठेवून ते बनावट चावीने गाड्या चोरत आणि विक्रीसाठी नारेगावातील जमीरच्या गॅरेजमध्ये देत होते. एमजीएम परिसरातून दुचाकी चोरलेला आरोपी जुनेद सेंटरच्या मोकळ्या मैदानाकडे येणार असल्याची माहिती १७ ऑक्टोबर रोजी उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून जुनेदला चोरीच्या दुचाकीसह पकडले.

चौकशीत त्याने परवेज आणि जमीरची नावे सांगितली. पोलिसांनी परवेजकडून एक, जमीरच्या गॅरेजमधून दोन, भोकरदनजवळ चार ते पाच हजारांना विक्री केलेल्या दोन आणि सावंगी बायपास रोडवरील झाडाझुडपांत लपवलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. जुनेदकडील दुचाकीसह एकूण आठ गाड्या हस्तगत करण्यात आल्या. कारवाईत हवालदार मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे आणि अतुल सोळंके सहभागी होते.

गॅरेजमध्ये गाड्यांची विक्री

जुनेद व परवेज गर्दीच्या ठिकाणी दुचाकींची रेकी करून बनावट चावीच्या मदतीने काही सेकंदांत गाड्या पळवत होते. चोरीच्या दुचाकी नारेगावातील गॅरेजचालक जमीरकडे विक्रीसाठी दिल्या जात होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक करून आठ दुचाकी हस्तगत केल्या.

हे सुद्धा वाचा : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

दोघेही निघाले भुरटे चोर 

जुनेद, परवेज हे मित्र आहेत. दोघे नशेसाठी बॅटऱ्या चोरी करुन ते पैशांतून व्यसनाची भूक भागवत होते. काही दिवसांपूर्वी चिकलठाणा परिसरात त्यांना बॅटरी चोरतांना नागरिकांनी पकडले होते. नागरिकांनी त्यांना चांगला चोप दिल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुचाकी चोरीप्रकरणी किती जणांना अटक केली?

    Ans: सिडको पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

  • Que: पोलिसांनी किती दुचाकी जप्त केल्या?

    Ans: आरोपींकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

  • Que: चोरट्यांचा छडा कसा लावला?

    Ans: परिसरातील सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

Web Title: The police have arrested three thieves who steal two wheelers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bike Theft
  • crime news

संबंधित बातम्या

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?
1

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
2

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
3

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…
4

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.