Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

वडगाव मावळ परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 02:07 PM
वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे : वडगाव मावळ परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. १९ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० ते २० ऑगस्ट रोजी पहाटे ३.१५ वाजेपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईत दोन ठिकाणांहून तब्बल ७ लाख ९७ हजार ७३० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भगवानराव भिसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शुभम ज्ञानेश्वर म्हाळसकर (वय २५, रा. म्हाळसकर वस्ती, वडगाव मावळ), गणेश नारायण जगनाडे (वय ४१, रा. बदालवाडी, नवलाख उंबरे) आणि राजू उर्फ राजवीर चौधरी (वय अंदाजे ३८, रा. डी.वाय. पाटील कॉलेजजवळ, आंबी) यांचा समावेश आहे.

म्हाळसकर वस्ती येथील आरोपी क्रमांक एकच्या पडक्या खोलीत तसेच बदालवाडी, नवलाख उंबरे येथील आरोपी क्रमांक दोनच्या १० बाय १२ फूट आकाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. आरोपी क्रमांक एकच्या ताब्यातून २ लाख ६७ हजार २१० रुपये, तर आरोपी क्रमांक दोनच्या ताब्यातून ५ लाख ३० हजार ५२० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, त्यांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विक्रीच्या उद्देशाने या पदार्थांची साठवणूक केल्याचा आरोप आरोपींवर आहे.

या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जप्त मालाचा उत्पादक, संबंधित कंपनीचे भागीदार, नॉमिनी आणि पुरवठादारांपर्यंत सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी शुभम म्हाळसकर व गणेश जगनाडे यांना २० ऑगस्ट रोजी सकाळी ६.२८ वाजता अटक करण्यात आली. या कारवाईची स्टे.डा. नोंद क्रमांक ०५/२०२६ अशी आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधवराव करीत असून, गुन्हा पोलीस हवालदार गायकवाड (ब.नं. ८२१) यांनी दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेला माल नेमका कुठून आला, त्याचा पुरवठा कोण करीत होते आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर प्रशासनाची नजर

दरम्यान, या कारवाईमुळे वडगाव मावळ व परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने अशा पदार्थांची बेकायदेशीर विक्री किंवा साठवणूक आढळल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: The police have arrested two individuals following a major operation in vadgaon maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
1

दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव
2

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
3

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
4

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.