संग्रहित फोटो
वणी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील गोळशी शिवारात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका २९ वर्षीय सोमवार (दि. १७) तरुणाचा हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
योगेश रघुनाथ लहांगे (वय २९, रा. गोळशी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश व आरोपींमध्ये आपापसात संगनमत करून ठरलेले पैसे वेळेवर न दिल्याने वाद निर्माण झाला होता. गोळशी फाटा ते गोळशी जाणाऱ्या रस्त्यावर आणि गोळशी शिवारात या पैशाच्या वादातून आरोपींनी योगेश याच्यावर कोणत्या तरी हत्याराने डोक्यावर व शरीरावर गंभीर वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत दोन आरोपींना गजाआड केले आहे. अ
शोक मधु गायकवाड (४८, धंदा – शेती, मूळ रा. निफाड गाव, हल्ली रा. गोळशी, ता. दिंडोरी) आणि किशोर हरी गांगोडे (४४, रा. ता. दिंडोरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैशाच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्याकांडाने गोळशी गावात शोकाकूल वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






