Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमधील व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा, दोघांना घेतले ताब्यात; तापासातून धक्कादायक माहिती उघड

रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाची सोन्याची बॅग लुटल्यानंतर पळून जात असताना आणखी एक शिकार करण्याच्या प्रयत्नात स्क्रॅप व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान (वय ४७) यांचा निघृण खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 01:00 PM
संभाजीनगरमधील व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा, दोघांना घेतले ताब्यात; तापासातून धक्कादायक माहिती उघड

संभाजीनगरमधील व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा, दोघांना घेतले ताब्यात; तापासातून धक्कादायक माहिती उघड

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाची सोन्याची बॅग लुटल्यानंतर पळून जात असताना आणखी एक शिकार करण्याच्या प्रयत्नात स्क्रॅप व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान (वय ४७) यांचा निघृण खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मोबाइल हिसकावण्यास विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्या पायावर चाकूचा जोरदार वार केला. त्यात मुख्य रक्तवाहिनी कापल्याने अतिरक्तस्राव होऊन बासित यांचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (वय २९, रा. संकट मोचन मारोती मंदीर जवळ, मुकुंदवाडी) आणि विक्की उर्फ सोनू मुधकर पाचवणे (वय २२, गल्ली क्रं.६, अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांना अटक केली आहे. चोरीतील सोने, लुटलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि कपडे जप्त केले आहेत. न्यायालयाने दोघांना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, जिन्सी ठाण्याचे निरीक्षक गणेश ताठं, सहायक निरीक्षाक सचिन वायाळ, उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर, अर्जुन कदम, हवालदार संजय गावंडे, योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंखे, श्रीकांत काळे, अमोल मुगळे, मनोहर गिते, गणेश सागरे, राजाराम डाखुरे, सागर पांढरे, विक्रम खंडागळ, प्रमोद सुरसे, सोमनाथ दुकळे आदींनी केली.

आरोपी कुठून आले याचा घेतला माग

गुन्ह्याचा उलगडा करताना पोलिसांनी आरोपी घटनास्थळी येण्याचा मार्ग शोधण्यावर भर दिला. सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर आरोपी आधी रेल्वे स्थानकावर चोरी करून आकाशवाणी चौकात आल्याचे स्पष्ट झाले. खून केल्यानंतर ते अपेक्स रुग्णालय, चिस्तिया चौक, कॅनॉट प्लेस, सिडको उड्डाणपूल मार्गे मुकुंदवाडीकडे गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.

वाढदिवस साजरा करतानाच टाकला छापा

खून आणि लूटीनंतर आरोपी मुकेश साळवे थेट घरी गेला. त्या दिवशी मुकेशचा वाढदिवस असल्याने तो मित्रांसोबत घराच्या गच्चीवर वाढदिवस साजरा करत होता. पुढील नियोजन सुरू असतानाच गुन्हे शाखेने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून सोनू पाचवणे यालाही अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

मुकेश सराईत गुन्हेगार

मुख्य आरोपी मुकेश साळवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांना आळा घालण्यासाठी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती.

Web Title: The police have arrested two individuals who murdered a businessman in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…
1

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
2

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
3

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
4

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.