Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल पंदीसह अकरा जणांवर मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मांचे आदेश

लोणीकंद, वाघोली, फुरसूंगी सांगवी, तळेगाव दाभाडे तसेच अहिल्यानगर भागातील कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह त्याच्या अकरा साथीदारांवर पुणे ग्रामिण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 03:52 PM
कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल पंदीसह अकरा जणांवर मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मांचे आदेश

कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल पंदीसह अकरा जणांवर मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मांचे आदेश

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न होत आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणीकंद, वाघोली, फुरसूंगी सांगवी, तळेगाव दाभाडे तसेच अहिल्यानगर भागातील कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह त्याच्या अकरा साथीदारांवर पुणे ग्रामिण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी, अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, सनी संजय यादव, आदित्य बापुसो उर्फ बापु शिंदे, आदित्य दिपक कांबळे, पांडुरंग बालाजी कांबळे, अभिषेक उर्फ घ्या हनुमान मिसाळ, सिद्धेश उर्फ सिद्धार्थ उर्फ बाल्या, तुकाराम शिंदे, सुरज उर्फ नन्या संतोष मोरे, देवांश शिवाजी चव्हाण, यांना अटक करण्यात आली असून, हे सर्व आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर गोपाळ संजय यादव हा फरार आहे.

पंदी टोळीवर लोणीकंद, वाघोली, फुरसूंगी, सांगवी तळेगाव दाभाडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआडीसी पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव एकत्र करणे, कट रचून खून करणे, बेकायदा अग्नशस्त्राचा वापर, खंडणी, दरोडा, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

गुंड विशाल पंदी आणि त्याच्या साथीदारांनी १ जून रोजी न्हावरे फाटा ते करडे रस्त्यावर उमेश अनिल जगदाळे याच्याशी पैशाच्या व्यवहारातून त्यांच्यासोबत असलेल्या विशाल सुनिल काळे (वय ३१,रा. ढोरआळी शिरुर) याचा गोळ्या झाडून दगडाने ठेचून खून केला होता. तर केदार झाडगे याच्या खूनाचा प्रयत्न केला होता. तसेच उमेश जगदाळे यांच्यावर गोळी झाडली होती. याप्रकरणी शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शिरुर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली होती.

हे सुद्धा वाचा : विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

चौकशीत पंदी टोळीची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी पहाता टोळीवर कायद्याचा वचक राहावा, परिसरात शांतता प्रस्थापीत व्हावी म्हणून पुणे ग्रामिण पोलिसांकडून मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला शर्मा यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार पंदी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: The police have taken major action against eleven individuals including vishal pandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
4

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.