Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Sunil Tatkare : शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याचे सांगत खासदार सुनील तटकरेंनी ती वाढवण्याची मागणी केली आहे. अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी अर्थखातं शिस्तीने सांभाळल्याचा दाखला देत तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळावं, अशी भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 09:58 PM
Sunil Tatkare on fadnavis

Sunil Tatkare on fadnavis

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज
  • सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
  • अर्थ खात्यावरून तटकरेंनी भूमिका केली स्पष्ट
 

Sunil Tatkare : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरून आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि मदत जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 5 हजारांच्या मदतीवरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच आता महायुती सरकारलाच घरचा आहेर भेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.

सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे. ही मदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, दिवंगत अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी अर्थखातं शिस्तीने सांभाळल्याचा उल्लेख करत तटकरेंनी राज्याच्या सध्याच्या अर्थकारभारावर अप्रत्यक्ष टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अर्थखात्यासाठी आग्रही

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे अर्थखातं मिळावं, यासाठी पक्ष आग्रही असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक शिस्त राखत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली होती, असे तटकरे म्हणाले.

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

या विधानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या अर्थखात्याच्या कारभाराबाबत तटकरेंनी अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. तटकरे यांनी हे वक्तव्य धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत अपुरी?

राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याची टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी सुनील तटकरे यांनी केली. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी मदतीच्या मुद्द्यावर सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपूर्वी मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणा केली होती. यंदा दुष्काळासंदर्भातील निर्णय आणि मदतीची प्रक्रिया लवकर सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

आता या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी पुढे आली आहे. सुनील तटकरे यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबरोबरच राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी कोणाकडे असावी, हा मुद्दाही चर्चेत आला आहे.

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Web Title: Sunil tatkare farmer relief maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण
1

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण

Manoj Jarange Patil : ‘पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले
2

Manoj Jarange Patil : ‘पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
3

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश
4

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.