Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 01:19 PM
व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

Follow Us
Follow Us:

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज केला जाणार आहे. पुणे पोलिसांकडून २३ जून रोजी याबाबत सत्र न्यायालायात अर्ज दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

 

सर्वोच्च न्यायालयाकडून अगरवाल याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर समाज माध्यमात अगरवाल आणि कुटुंबीय जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. ‘पुणे पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अगरवाल याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी तयारी सुरू केली आहे. २३ जून रोजी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाची परवानगी मिळवण्यात आली आहे’, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगरवाल याच्या अल्पवयीन मुलासह मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल आणि साथीदारांनी ससूनमधील डाॅक्टरांशी संगनमत केले होते. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक केली होती. त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अगरवालने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालायने कठोर अटी, शर्तींवर अगरवालचा जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर अगरवाल याची कुटुंबीयांसोबत जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली होती. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले होते. जबाब आणि डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल याला घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…

पोलिसांचे म्हणणे काय ?

विशाल अगरवाल याने संबंधित चित्रफीत २०२३ मधील असल्याचा दावा केला होता. जामीन मिलाल्यानंतर जल्लोष केला नाही, असे अगरवाल याने सांगितले होते. मात्र, पोलिसंनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. जामीन मिळाल्यानंतर जल्लोषाची चित्रफीत ही समाज माध्यमातील स्टेटसवर ठेवणे ही बाब मृतांच्या कुटुंबीयांची भावना दुखावणारी आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: The pune police have filed an application in court to cancel vishal agarwals bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Porshe Accident
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
2

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
3

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.