Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांचा गोंधळ!

Maharashtra Breaking: सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना नाव, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच ही भेट होत आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 06:34 PM
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Politics:  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या ६ खासदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सकाळी ९ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचणार असून, मोदी या सर्व खासदारांसोबत नाश्त्यावर चर्चा करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना नाव, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच ही भेट होत आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय रणनीती ठरते आणि पंतप्रधान मोदी शिंदे गटातील खासदारांना काय कानमंत्र देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

The liveblog has ended.
  • 07 Aug 2026 06:30 PM (IST)

    07 Aug 2026 06:30 PM (IST)

    Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

    कारंजा: कारंजा नगर परिषद अंतर्गत शहरात सर्वत्र तुडुंब भरून साचलेल्या नाल्या, घंटागाड्यांच्या तुटवड्‌यामुळे घरोघरी साचलेला कचऱ्याचा ढीग त्यामुळे ढासळलेली स्वच्छता व्यवस्था या व्यवस्थेमुळे या ऐतिहासिक शहरात घंटागाड्यांची झालेली ‘उलंगवाडी’ याची चर्चा नागरिकांमध्ये होत असताना दिसत आहे. ही उलंगवाडी नेमकी नगर परिषदेची की घंटागाडी व्यवस्थेची? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. ‘उलंगवाडी’ हा शब्द सामान्यतः खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतात काहीही शिल्लक राहत नाही, त्या अवस्थेसाठी वापरला जातो. मात्र, कारंजा शहरातील नागरिक आता हाच शब्द शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या दयनीय अवस्थेसाठी वापरत आहेत.

  • 07 Aug 2026 06:18 PM (IST)

    07 Aug 2026 06:18 PM (IST)

    Devendra Fadnavis: ‘मुंबई 3.0’ला जागतिक बळ! रायगड-पेणमध्ये १०० एकरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; १.१ अब्ज डॉलरच्या FDIची अपेक्षा

    मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश आहे. नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे. यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

  • 07 Aug 2026 06:05 PM (IST)

    07 Aug 2026 06:05 PM (IST)

    एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

    राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेत अलीकडेच दाखल झालेले सहा खासदारही उपस्थित होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्राच्या विकासासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली.

  • 07 Aug 2026 06:04 PM (IST)

    07 Aug 2026 06:04 PM (IST)

    Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये  लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल...

    पुणे: ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी भारताच्या पदक मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला. भारताने जिंकलेल्या ३९ पदकांपैकी १६ पदके (४१ टक्के) लष्कराच्या खेळाडूंनी मिळविली. या यशामागे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) या उच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राची भक्कम तयारी आणि वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती महत्त्वाची ठरली.

  • 07 Aug 2026 05:58 PM (IST)

    07 Aug 2026 05:58 PM (IST)

    अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या ‘एक झाड आईच्या नावाने’ या पर्यावरणपूरक अभियानाला अहिल्यानगरच्या कर्जत शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी एक वेगळा आणि भावूक स्पर्श दिला आहे. पोटरे यांनी कर्जत शहरात थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आईच्या नावाने ७० विविध झाडांची लागवड केली असून, केवळ झाडे लावून न थांबता गेल्या वर्षभरापासून त्यांचे मुलाप्रमाणे संगोपनही केले आहे.

  • 07 Aug 2026 05:45 PM (IST)

    07 Aug 2026 05:45 PM (IST)

    डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत

    FSSAI च्या कारवाईत बंदी घातलेल्या FMCG कंपनी डाबर इंडियाला ( Dabur FSSAI Ban ) काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. कंपनीसाठी ही सध्याची सर्वात मोठी बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे. न्यायालयाने FSSAI च्या त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये कंपनीला ‘१००% शुद्ध’ १००% नैसर्गिक आणि अशाच प्रकारचे इतर दावे असलेली खाद्य उत्पादने विकण्यास मनाई करण्यात आली होती. पण न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर, आता त्यांना ही उत्पादने विकता येणार आहे. पण नेमका हा दिलासा तात्पुरता आहे.

  • 07 Aug 2026 05:30 PM (IST)

    07 Aug 2026 05:30 PM (IST)

    शाश्वत मत्स्यव्यवसायासाठी IMIA चं मोठं पाऊल! महाराष्ट्र-गोव्याच्या व्यवसायिकांना होणार मोठा फायदा

    महाराष्ट्र-गोवा फिशरी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट्स (FIPs) च्या समावेशासह IMIA ने राष्ट्रीय शाश्वतता उपक्रमातील दुसरा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.  इंडियन मरीन इंग्रिडियंट्स असोसिएशन (IMIA) ने आज आपल्या राष्ट्रीय शाश्वतता उपक्रमातील दुसरा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्र-गोवा स्मॉल पेलॅजिक फिशरी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट (FIP) आणि इंडियन वेस्ट कोस्ट मल्टी-स्पिशीज ट्रॉलर FIP यांचा IMIA च्या राष्ट्रीय जबाबदार मत्स्यव्यवसाय विकास ( Sustainable Fisheries Movement ) आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 05:15 PM (IST)

    07 Aug 2026 05:15 PM (IST)

    चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

    श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

  • 07 Aug 2026 04:57 PM (IST)

    07 Aug 2026 04:57 PM (IST)

    JPSC-JSSC परीक्षा आंदोलनात खळबळ; AISA राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर रांचीत शाईफेक!

    जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्येही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रांचीमध्ये, जेपीएससी-जेएसएससी परीक्षेच्या वादाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे घटनास्थळी काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घडामोडीमुळे जेपीएससी-जेएसएससी आंदोलनासंदर्भातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

  • 07 Aug 2026 04:47 PM (IST)

    07 Aug 2026 04:47 PM (IST)

    ‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अलीकडील वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले. वाचा सविस्तर... 

  • 07 Aug 2026 04:37 PM (IST)

    07 Aug 2026 04:37 PM (IST)

    पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल

     नवऱ्याला औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर बॅटने मारहाण करून घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील जामदार रोड परिसरात असलेल्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शर्मिला प्रविण जगताप (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाणे भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 04:27 PM (IST)

    07 Aug 2026 04:27 PM (IST)

    जळगावकरांनी सावध राहा! आज जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

    गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात हवामान सतत बदलत आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत, तर काही भागात दिवसभर ढग दाटून येत आहेत. मोठ्या पावसानंतर काही दिवस वातावरण शांत होते, मात्र आता पुन्हा हवामान खात्याने जिल्ह्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामानाची माहिती लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जाहीर केला आहे. याचा अर्थ काही भागात अचानक पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्याचा अनुभव येऊ शकतो. हवामानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 04:15 PM (IST)

    07 Aug 2026 04:15 PM (IST)

    राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

    राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये पाठवली आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, त्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित करण्यात आली असून, अनेकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर... 

  • 07 Aug 2026 03:59 PM (IST)

    07 Aug 2026 03:59 PM (IST)

    Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

    पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरातून प्रेमसंबंधाचे भयावह रूप समोर आले आहे. शाळेपासून सुरू झालेल्या प्रेमकथेचा शेवट रक्तरंजित हत्येत झाला. लव्ह ट्रँगलमधून संतापलेल्या एका तरुणाने पीजीमध्ये घुसून लोखंडी रॉडने तरुणाची निर्घृण हत्या केली, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण थरारक घटना पीजीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 07 Aug 2026 03:56 PM (IST)

    07 Aug 2026 03:56 PM (IST)

    Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी

    रत्नागिरी: जिल्ह्यातील न्यायालयीन व महसूल यंत्रणेच्या कारभारावर सध्या प्रचंड ताण असल्याचे चित्र समोर आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व विविध तहसीलदार कार्यालयांच्या स्तरावर तब्बल १२३९ अर्धन्यायायिक प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याच्या आशेने सर्वसामान्य नागरिक महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून, प्रशासकीय दिरंगाईचा थेट फटका जनतेला बसत आहे. प्रलंबित प्रकरणांच्या वाढत्या तक्रारींमुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

  • 07 Aug 2026 03:52 PM (IST)

    07 Aug 2026 03:52 PM (IST)

    Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

    जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी असलेल्या मेटा (Meta) फेसबुक आणि इंस्टाग्रामची पालक कंपनी वर संकटाचे ढग अधिकच गहिरे झाले आहेत. एका बाजूला भारतात मेटाच्या उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील अल्गोरिदम आणि भारतीय कायद्यांच्या पालनाबाबत चौकशीला सामोरे जावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेतून कंपनीसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील एका न्यायालयाने मेटाला तरुण आणि किशोरवयीन वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समर्पित विशेष निधीमध्ये ५६७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५४ अब्ज रुपये) जमा करण्याचा आणि आपल्या प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीत तातडीने मोठे बदल करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला आहे.

  • 07 Aug 2026 03:47 PM (IST)

    07 Aug 2026 03:47 PM (IST)

    Mumbai Handloom Exhibition 2026: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत खास प्रदर्शन; देशभरातील पारंपरिक वस्त्रांचा अनोखा मेळा

    Mumbai Handloom Exhibition News: भारतीय हातमाग उद्योग हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. अनेक राज्यांतील कारागीर आजही पारंपरिक पद्धतीने सुंदर वस्त्रे तयार करत आहेत. या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विणकरांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी मुंबईत विशेष हातमाग प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि अस्सल हातमाग उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळणार आहे.

  • 07 Aug 2026 03:35 PM (IST)

    07 Aug 2026 03:35 PM (IST)

    Pune Traffic : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

    पुणे : वाहतुक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टाॅम टाॅम’ या संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार पुणे हे जगातील वाहतुक काेंडीत पहील्या पाच शहरात आहे. तर बंगळूरु हे दुसऱ्या क्रमांकावरील शहर ठरले आहे. टाॅम टाॅम या संस्थेने २०२५ सालच्या वाहतुक व्यवस्थेचा अभ्यास केला. जगातील विविध प्रमुख शहरांतील वाहतुक काेंडीचा  अभ्यास करून संस्था दरवर्षी अहवाल सादर करते. संस्थेच्या अहवालानुसार २०२५ मध्ये वाहतूककोंडीमुळे पुणेकरांचे १५२ तास वाया गेले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सरासरी ७१ टक्के असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. शहरात १८ किलोमीटर प्रतितास असा वाहनांचा सरासरी वेग असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२४) तुलनेत टक्क्यांत ५.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.

  • 07 Aug 2026 03:20 PM (IST)

    07 Aug 2026 03:20 PM (IST)

    Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! कोथिंबिरीची आवक वाढली, दर थेट १० रुपयांवर

    महाड: “कोथिंबीर घ्या… ताजी ताजी कोथिंबीर !” अशा आरोळ्यांनी सध्या महाडची भाजी बाजारपेठ अक्षरशः दुमदुमून गेली आहे. काही महिन्यांपूर्वी चढ्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली कोथिंबीर आता मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाल्याने तिच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी, ३० ते ५० रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची गड्डी आता अवघ्या १० रुपयांत उपलब्ध होत असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 07 Aug 2026 03:10 PM (IST)

    07 Aug 2026 03:10 PM (IST)

    Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

    आयपीएल २०२६ चा हंगाम संपून फक्त २ महिने झाले आहेत. त्यातच आगामी आयपीएल २०२७ साठी फ्रँचायझींमधील अंतर्गत वाद आणि खेळाडूंच्या ट्रेडच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. यामध्ये एक नाव सर्वात चेर्चेत आहे ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या. संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या अनुभवी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिक पांड्यासमोर मोठे आव्हान होते. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स रामराम ठोकणार असा दावा केला जात होता. काही दिससांआधी चेन्नई सुपर किंग्स या ट्रेडच्या शर्यतीत आघाडीवर होते, पण आता चित्र पालटताना दिसत आहे, कारण केकेआरनेही हार्दिकमध्ये रस दाखवला आहे.

  • 07 Aug 2026 03:02 PM (IST)

    07 Aug 2026 03:02 PM (IST)

    ‘प्रसाद लाड दिसले तर कानशिलात लगावणार’; लक्ष्मण हाके यांचा इशारा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी अलीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केल्यानंतर सुरू झालेल्या वादात हाके यांनी थेट इशाराच दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

  • 07 Aug 2026 02:58 PM (IST)

    07 Aug 2026 02:58 PM (IST)

    'दगडावरील ठशांपेक्षा मुलांकडे लक्ष द्या', राज ठाकरेंचा सल्ला

    दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा डिवचलंय. चंद्रकांत पाटलांनी दगडावरील ठसे शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे.

  • 07 Aug 2026 02:49 PM (IST)

    07 Aug 2026 02:49 PM (IST)

    मुंबई महापौर कार्यालयाला धमकीचा मेल

    मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाची धमकीचा मेल आला आहे. महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या असून काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीही महापौरांना दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. दरम्यान या धमकीनंतर मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॉम्बशोधक पथकही मुख्यालयात दाखल झालंय.

  • 07 Aug 2026 02:41 PM (IST)

    07 Aug 2026 02:41 PM (IST)

    शिक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा, पदोन्नतीबाबत महत्वाची अपडेट

    शालेय शिक्षण विभागाने २९ जुलैला निर्णयाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली होती. यामुळे काही महिन्यांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याची आशा शिक्षकांना होती. मात्र त्यावर आता महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिक्षकांना आशा लागून राहिलेल्या या पदोन्नती आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • 07 Aug 2026 02:30 PM (IST)

    07 Aug 2026 02:30 PM (IST)

    राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीत प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या चर्चेला वेग आला आहे. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत पक्षाच्या राज्य नेतृत्वावर चर्चा केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. पक्षबांधणी, संघटनात्मक रचना आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 07 Aug 2026 02:11 PM (IST)

    07 Aug 2026 02:11 PM (IST)

    डॉक्टरांना मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला जामीन मंजूर

    डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपात अटक झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेसह अन्य आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. न्यायालयाने आरोपींना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले असून, आठवड्यातून तीन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक केली आहे.

  • 07 Aug 2026 02:10 PM (IST)

    07 Aug 2026 02:10 PM (IST)

    अभिजीत दीपके पोलिसांवर भडकले; नेमकं काय घडलं?

    भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवलं जात असल्याच्या आरोपावरून अभिजीत दीपके संतापले. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारत नाराजी व्यक्त केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळल्यानंतर दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  • 07 Aug 2026 02:00 PM (IST)

    07 Aug 2026 02:00 PM (IST)

    गेल्यावर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यांवर खड्डे कमी; महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा

    शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचा दावा महापौर मंजुषा नागपुरे यांनी केला आहे. त्याचवेळी स्थायी समितीने खड्डयांसदर्भात प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेत मात्र बैठका, पाहण्या आणि सूचना यांचेच सत्र सुरू असल्याचे चित्र आहे.

  • 07 Aug 2026 01:50 PM (IST)

    07 Aug 2026 01:50 PM (IST)

    अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, न्याय विभागाची कठोर कारवाई

    अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या घरमालकाचे अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारे कृत्य समोर आले आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील स्टेट कॉलेज परिसरातील मालमत्ता मालक व्यंकटचलम मणी (Venkatachalam Mani) यांच्यावर एका महिला भाडेकरूचा वारंवार गंभीर लैंगिक छळ केल्याचा, तिला अयोग्य स्पर्श केल्याचा आणि तिने विरोध दर्शवताच तिच्यावर जीवघेणा सूड उगवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) आरोपी व्यंकटचलम मणी याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात एक गंभीर फेडरल खटला दाखल केला असून, कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • 07 Aug 2026 01:40 PM (IST)

    07 Aug 2026 01:40 PM (IST)

    चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास लॉयल्टी प्रोग्राम लाँच

    भारतातील सर्वात वेगाने वाढ होणारी विमान कंपनी अकासा एअरने ( Akasa Air )  आज प्रत्येक प्रवास अधिक फायदेशीर बनवण्यासाठी अकासा एलिव्हेट हा आपला लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला आहे. ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा विचार करून तयार केलेला अकासा एलिव्हेट, सदस्यांना पात्र फ्लाईट्स तसेच इतर अतिरिक्त सेवा आणि उत्पादनांवर एलिव्हेट पॉईंट्स मिळवण्याची, जलद व सोप्या पद्धतीने पुढील टप्पा गाठून खास फायदे मिळवण्याची आणि विमानाने प्रवास करण्याचा भारतातील सर्वात फायदेशीर अनुभव घेण्याची संधी देतो.

  • 07 Aug 2026 01:30 PM (IST)

    07 Aug 2026 01:30 PM (IST)

    १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी

    मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. महापौरांच्या अधिकृत ई-मेल खात्यावर आलेल्या या धमकीच्या मेलमध्ये त्यांच्या कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच 15 ऑगस्टपूर्वी हल्ला केला जाईल, असा दावाही मेलमध्ये करण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 01:20 PM (IST)

    07 Aug 2026 01:20 PM (IST)

    काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी

    मध्य आफ्रिकेतील ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ (DRC) देश सध्या एका अत्यंत वेदनादायी आणि भयानक आरोग्य संकटाचा सामना करत आहे. देशात वेगाने पसरत असलेल्या इबोलाच्या (Ebola) प्राणघातक साथीमुळे हाहाकार माजला असून, या संसर्गाने निष्पाप बालकांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधी अर्थात ‘युनिसेफ’ने (UNICEF) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात या परिस्थितीबद्दल अत्यंत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. १५ मे रोजी अधिकृतपणे घोषित झालेल्या या साथीच्या उद्रेकात आतापर्यंत तब्बल ३३० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, परिस्थिती दिवसागणिक अधिकच हाताबाहेर जात चालली आहे.

  • 07 Aug 2026 01:11 PM (IST)

    07 Aug 2026 01:11 PM (IST)

    मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा हद्दीतील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (दि. 7) पहाटे झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इतक्या जोरात धडक दिली की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • 07 Aug 2026 01:02 PM (IST)

    07 Aug 2026 01:02 PM (IST)

    गुन्हेगारांची काढली ‘धिंड’ अन् पोलिसांची झाली अडचण!

    बदलत्या गुन्हेगारीने पुण्याची लक्तरे वेशीला टांगली जात असल्याने पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा मस्तावलेपणा मोडीत काढण्यासाठी ‘धिंड’चा नवा डाव सुरू केला खरा, पण तो आता पोलिसांच्या अडचणीचा ठरू लागला आहे. पुण्यातील दोन प्रकरणे पुणे पोलिसांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन व्हायरल व्हिडीओची राज्य मानवी हक्क आयोगाने सु-मोटो दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मात्र, यामुळे पोलिसांचे मनोधैर्य डाऊन होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पुणेकरांकडून देखील या आयोगाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाच्या खूनाची घटना घडली होती. नंतर यामधील पकडलेल्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिस गाडीवर बसवून त्यांना बांधून आणत असताना एका महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यापुर्वी काही आरोपींना गुडघ्यावर बसवून भररस्त्यातून फिरविण्यात (धिंड) आले होते. याप्रकरणाचेही व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या दोन्ही व्हिडीओ संदंर्भाने ही चौकशी सुरू आहे.

  • 07 Aug 2026 12:48 PM (IST)

    07 Aug 2026 12:48 PM (IST)

    खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    बाजीराव रस्त्यावर भरदुपारी झालेल्या एका अल्पवयीन मुलाच्या खुनातील आरोपींना पुणे पोलिसांनी तब्बल १२ कोयत्यांसह पकडले आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पर्वती परिसरात धारदार शस्त्रांसह दहशत माजविण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. विशेषत: कोयते या आरोपींनीच बनविले असल्याचेही समोर आले आहे. गौरव राजू कांबळे (वय १८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 12:36 PM (IST)

    07 Aug 2026 12:36 PM (IST)

    पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून

    बाणेरमधील ब्रम्हकुमारी मेडिटेशन सेंटरमधील महिलेशी एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात जागामालकाचा एकाने धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि या घटनेची माहिती दिली. घनश्याम संजय रायकर (वय ४९, रा. ब्रम्हकुमारी मेडिटेशन सेंटरसमोर, बाणेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सोलुमन सुर्यभान शेंडगे (वय ५२, रा. फिरस्ता) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (दि. ६) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास रायकर फार्म हाऊस बाणेर परिसरात घडली आहे.

  • 07 Aug 2026 12:24 PM (IST)

    07 Aug 2026 12:24 PM (IST)

    ‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान!

    रात्रीच्या शांततेचा भंग करत फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरच्या बुलेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ अंतर्गत अवघ्या तीन दिवसांत २७४ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ८४ बेकायदा मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. पुणे शहरात गेल्या काही वर्षांत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा फेरफार करून फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अनेक दुचाकीस्वार कर्णकर्कश हॉर्नचा वापर करत असल्याने नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी आता केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर अशा प्रकारचे बेकायदा सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहनांमध्ये बदल करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 12:12 PM (IST)

    07 Aug 2026 12:12 PM (IST)

    मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा हद्दीतील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (दि. 7) पहाटे झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इतक्या जोरात धडक दिली की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आयशर टेम्पो चालक कुलदीप बाबुराव पवार यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अपघातात तुषार वामन भूमकर (वय 38, रा. भूमकर चौक, वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित भाटे, प्रदीप भुसारे, पंकज पाटील आणि प्रसाद विनोदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 07 Aug 2026 11:51 AM (IST)

    07 Aug 2026 11:51 AM (IST)

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांचा गोंधळ!

    Sadhus Protest On Rahul Gandhi Residence:  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांसह अनेक नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली हे.. आंदोलनाची माहिती मिळताच, दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करणाऱ्या अनेक साधू आणि संतांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास साधू आणि संतांसह अनेक आंदोलक अचानक राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. आंदोलकांनी काँग्रेस पक्षाविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलन केले. परिस्थिती पाहून दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

  • 07 Aug 2026 11:50 AM (IST)

    07 Aug 2026 11:50 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

    राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्यापर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक विलंबामुळे निधी वितरणास उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कोणत्याही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

  • 07 Aug 2026 11:45 AM (IST)

    07 Aug 2026 11:45 AM (IST)

    निवासी डॉक्टरांच्या संपाचा ससूनच्या नियमित सेवांवर परिणाम; मोठ्या-लहान शस्त्रक्रिया घटल्या

    निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका ससून सर्वोपचार रुग्णालयातील नियमित आरोग्यसेवांना बसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः नियोजित मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांची संख्या लक्षणीय घटली. मात्र, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि गंभीर रुग्णांवरील उपचार सुरू ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले.

  • 07 Aug 2026 11:35 AM (IST)

    07 Aug 2026 11:35 AM (IST)

    ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ

    मध्य पूर्वेतील लष्करी कारवाया आणि इराणसोबतच्या संघर्षानंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात आणि प्रशासनात मोठा वाद निर्माण झाल्याच्या बातम्यांनी जागतिक वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि देशाचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यात शस्त्रास्त्रांच्या तुटवड्यावरून आणि लष्करी रणनीतीवरून कॅम्प डेव्हिड येथे तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचा दावा काही प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रांनी केला होता. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांच्यात आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये कोणतीही कटुता नसून ते पीट हेगसेथ यांच्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी आहेत.

  • 07 Aug 2026 11:32 AM (IST)

    07 Aug 2026 11:32 AM (IST)

    ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

    लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नव्या पर्वाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच निर्मात्यांनी शोचा फर्स्ट लूक लोगो आणि टीझर प्रदर्शित केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर ‘बिग बॉस 20’च्या सेटचा कथित फोटो व्हायरल झाला असून, संभाव्य स्पर्धकांच्या नावांचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 07 Aug 2026 11:30 AM (IST)

    07 Aug 2026 11:30 AM (IST)

    फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?

    इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आपल्या प्रभावी गतीने नावलौकिक मिळवलेल्या या तरुण वेगवान गोलंदाजाने हॅम्पशायर काउंटी संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करून आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले होते, परंतु पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे त्याचा प्रवास अकाली संपुष्टात आला.

  • 07 Aug 2026 11:28 AM (IST)

    07 Aug 2026 11:28 AM (IST)

    वसईत बेकायदा बांधकामाला पालिकेचे अभय? तोडक पथक कारवाईशिवाय माघारी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील व्होल्टन हॉटेलमागील बेकायदा व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी ( Vasai Illegal Construction  ) गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माधार घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही संबंधित बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच ते पुन्हा उभे राहिल्याचा आरोप होत असताना नव्याने कारवाई न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • 07 Aug 2026 10:52 AM (IST)

    07 Aug 2026 10:52 AM (IST)

    संतापजनक! 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेलं आणि…, आज ‘भंडारा बंद’

    भंडारा शहरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्या बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ ची हाक देण्यात आली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आणि या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची जोरदार मागणी होत आहे.

  • 07 Aug 2026 10:42 AM (IST)

    07 Aug 2026 10:42 AM (IST)

    तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल

    ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उद्यापासून म्हणजेच 8 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट फ्रिडम सेल 2026 सुरु होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीजवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ग्राहकांना सेलमध्ये अनेक वस्तू ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • 07 Aug 2026 10:32 AM (IST)

    07 Aug 2026 10:32 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘प्राइम फोकस स्टुडिओज’चे उद्घाटन; जागतिक मनोरंजन उद्योगासाठी

    मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत, निर्माता नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस स्टुडिओज फेज 1’ या अत्याधुनिक स्टुडिओ कॅम्पसचे उद्घाटन 6 ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये उभारलेल्या या जागतिक दर्जाच्या कॅम्पसमध्ये क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजी टीम्सना एकाच छताखाली आणण्यात आले असून, मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्याची उभारणी करण्यात आली आहे.

  • 07 Aug 2026 10:22 AM (IST)

    07 Aug 2026 10:22 AM (IST)

    ‘तू दुसऱ्याशी का बोलतेस?’… संशयातून 17 वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय विद्यार्थिनींची तिच्याच घरात गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या वेळी ही विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिची हत्या तिच्या प्रियकराने संशयातून केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येपूर्वी तिचा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील आहे.

  • 07 Aug 2026 10:12 AM (IST)

    07 Aug 2026 10:12 AM (IST)

    ‘आता नवीन वाहने खरेदी करू नका, सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकणार

    केंद्र सरकार डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. लोकांनी पुढील काही वर्षे नवीन वाहने खरेदी करू नये, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केले. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये केजरीवाल यांनी आरोप केला की, E-20 इंधन प्रणाली लागू केल्यानंतर सरकार पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढवण्याची योजना आखत आहे.

Web Title: 7 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national international politics students protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Breaking
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
1

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
2

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
4

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.