Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

सिंहगड रोड पोलिसांनी गस्तीदरम्यान रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला जेरबंद करून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहेत. आरोपीकडून सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 05, 2026 | 12:30 AM
रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आता ॲक्शन मोडवर आले आहेत. अशातच आता सिंहगड रोड पोलिसांनी गस्तीदरम्यान रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला जेरबंद करून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहेत. आरोपीकडून सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी ही कारवाई इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील नवीन डीपी रोड, कल्पतरू ब्लॉसम सोसायटीजवळ केली आहे. यश उर्फ दाद्या कमलाकर घोलप (वय १८, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

गेल्या आठवड्यात (दि. ३० जुलै) गुन्हे प्रतिबंधक गस्ती घातली जात होती. तेव्हा पोलिस अंमलदार विनायक मोहिते व सागर शेडगे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी यश उर्फ दाद्या याच्याकडे पिस्तूल असून, तो इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील नवीन डीपी रोड, कल्पतरू ब्लॉसम सोसायटीजवळ थांबला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला

नातेवाईक महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत चौघांनी तरुणाच्या घरात प्रवेश करून त्याच्यासह वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडलेल्या या घटनेत पिता-पुत्र दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी याज्ञवल्क्य मदनलाल तिवारी (वय २२), आदर्श शारदा तिवारी (दोघे रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), आशीष मिश्रा आणि एका अनोळखी व्यक्तीवर फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुज राजेश पांडे (वय २६, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: The sinhagad road police have arrested a criminal with a police record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.