Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 04:41 PM
‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पाटस : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे वेगवेगळ्या भागात नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे.

ज्येष्ठ महिला शेतकरी सुनंदा बापू रूपनवर (वय ६५ वर्षे) या शेतात ऊस लागवड करून झाडाजवळ बसल्या असताना सुमित उर्फ घाऱ्या साळुंखे व त्याचे दोन साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले. दोघांनी ‘मावशी, साप आला!’ असे ओरडून त्यांना घाबरवले. घाबरून पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील सोन्याचे डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावली आणि मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी रूपनवर यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत सुमित उर्फ घाऱ्या ईश्वर साळुंखे (वय १९, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली आहे. पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून तरुणाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: The yavat police have arrested a thief who stole gold jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
1

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
3

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…
4

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.