Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

शिवसेनेच्या (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुखावर रविवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगाराने जीवघेणा चाकूहल्ला केल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 01:37 PM
छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्...

छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुखावर रविवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगाराने जीवघेणा चाकूहल्ला केल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. आण्णा, मी मजाक करत होतो… असे म्हणत गळाभेट घेतल्यानंतर आरोपीने अचानक कमरेतील चाकू काढून गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पदाधिकाऱ्याला त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधान राखत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला.

 

राम शेषराव बोडखे असे चाकूहल्ला करणाऱ्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तो देखील जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनिल माने यांनी दिली. तर आंबादास आसाराम म्हस्के (५५, रा. म्हस्के गल्ली, पडेगाव) असे गंभीर जखमी झालेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. प्रकरणात आंबादास म्हस्के यांचे पुतण्या खंडू भीमराव म्हस्के (३९) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ते पडेगाव येथे हॉटेल व्यवसाय करतात. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारापासून आरोपी राम बोडखे हा आंबादास म्हस्के यांच्या मोबाइलवर वारंवार फोन करत होता. फोनवरून त्याने तु शिरसाटची औलाद आहेस, तु शिरसाटचा कुञा आहेस, तुझ्या हिंमत असेल तर आता मला बाबा पेट्रोल पंपावर भेटायला ये, असे म्हणत धमकी दिली. वारंवार सुरु असलेल्या धमक्यामुळे आंबादास म्हस्के यांनी हा प्रकार पुतण्या खंडु म्हस्के यांना सांगितला. यानंतर दोघेही चारचाकी वाहनातून (एमएच-२०-जीएम-७०७१) रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप परिसरात पोहोचले. एस.टी. स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर आरोपी राम बोडखे उभा असल्याचे त्यांना दिसले. वाहन थांबवल्यानंतर आंबादास म्हस्के हे आरोपीकडे गेले. त्यावेळी आरोपीने अगदी शांतपणे आण्णा, मी मजाक करत होतो, असे म्हणत त्यांना जवळ घेत गळाभेट घेतली.

तुझा मर्डर करतो, म्हणत गळ्यावर केले सपासप वार

गळाभेट घेताच आरोपी राम बोडखे याने आज तुझा मर्डर करतो, असे म्हणत कमरेचा चाकू काढला. त्याने डाव्या हाताने आंबादास म्हस्के यांना पकडून थेट गळ्यावर वार केला. वार चुकविण्याच्या प्रयत्नात पहिला वार निसटता लागला; मात्र दुसरा वार मानेवर खोलवर बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या घटनेमुळे महावीर चौक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे सुद्धा वाचा : प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! भररस्त्यात पत्नीवर 50 वार करत केली हत्या; पतीचं आत्मसमपर्ण

पुतण्याने पटकन काकाला रुग्णालयात केले दाखल

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंबादास म्हस्के यांनी स्वतःला वाचविण्यासाठी बाजूला होण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखम झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ही संपूर्ण घटना पाठीमागे उभ्या असलेल्या खंडु म्हस्के यांच्या डोळ्यासमोर घडली. त्यांनी तत्काळ धाव घेत आरोपीला दूर ढकलले आणि रक्तबंबाळ अवस्थेतील चुलत्याला चारचाकीत बसवून घाटीत नेले, प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. खंडु म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सराईत आरोपी राम बोडखे याच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: There has been an incident of a knife attack on a shiv sena leader in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • shivsena

संबंधित बातम्या

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
1

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना
2

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?
3

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ
4

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.