Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद; एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संत तुकाराम नगर येथील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 29, 2025 | 01:19 PM
कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद; एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार

कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद; एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना दररोज वेगवेळ्या भागात घडत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संत तुकाराम नगर येथील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी (२८ जुलै) सकाळी ११:३० वाजता घडली आहे.

तन्मय अविनाश कांबळे (वय१८, कासारवाडी) याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहल शेख, बिराज विश्वकर्मा, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अनिश पिंगळे नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेले असता, अभिषेक गिरी आणि अल्फान निसार पठाण यांनी अनिशसोबत फ्रेशर पार्टीला जाण्यावरून वाद घातला आणि त्याला शिवीगाळ केली. सकाळी साडेअकरा वाजता कॉलेज सुटल्यानंतर डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजच्या गेटवर त्यांच्या ओळखीचे यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड, सोहेल मुनीर सोहेल शेख, शिवराज तलवारे, निहाल, बिराज विश्वकर्मा आणि इतर मुलांनी फिर्यादीला बोलावून घेतले. त्यापैकी निहाल याने फिर्यादीच्या अंगावर त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटारसायकल घातली. सोहेल मुनीर याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या हाताला मारून त्याला गंभीर जखमी केले.

तसेच फिर्यादीच्या जुन्या घराशेजारी राहणारा शिवराज तलवारे यानेही त्याच्या ताब्यातील मोटारसायकल फिर्यादीच्या अंगावर घातली. त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर “आम्ही डी. वाय. पाटीलचे भाई आहोत” असे ओरडत, हातात असलेले कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि तेथून निघून गेले. संत तुकारामनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

Web Title: There has been an incident of a student being attacked over an argument in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.